जर तुम्ही नवीन स्मार्टफोन (smartphone)घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे. OnePlus 13 या लोकप्रिय फ्लॅगशिप स्मार्टफोनवर सध्या आकर्षक ऑफर देण्यात आली आहे, ज्यामध्ये तुम्ही तब्बल 11,000 रुपयांची बचत करून हा फोन खरेदी करू शकता. या ऑफरनंतर हा स्मार्टफोन ₹72,999 ऐवजी ₹63,999 इतक्या किंमतीत उपलब्ध आहे. ही लिमिटेड टाइम डील Amazon India वर सुरू असून, खरेदीदारांना यासोबत अतिरिक्त ₹1,900 पर्यंतचा Amazon Pay कॅशबॅक देखील मिळू शकतो. त्यामुळे फोनची प्रभावी किंमत आणखी कमी होते. हा स्मार्टफोन Black Eclipse, Midnight Ocean आणि Arctic Dawn या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

OnePlus 13 हा या वर्षातील सर्वात दमदार फ्लॅगशिप स्मार्टफोनपैकी(smartphone) एक मानला जातो. यात नवीनतम Qualcomm Snapdragon 8 Elite प्रोसेसर आणि Adreno 830 GPU दिला गेला आहे, जो अप्रतिम परफॉर्मन्स देतो. फोनमध्ये 6.82-इंचाचा LTPO 4.1 AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि तब्बल 4500 निट्स पीक ब्राइटनेस मिळतो. हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित असून चार मोठे Android अपग्रेड्स आणि पाच वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देण्याचे OnePlus ने आश्वासन दिले आहे.
कॅमेऱ्याच्या बाबतीत, OnePlus 13 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे – ज्यात 50MP प्रायमरी लेन्स (OIS सह), 50MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स (120° फील्ड ऑफ व्ह्यू) आणि 50MP पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स (3x ऑप्टिकल झूमसह) देण्यात आले आहेत. 32MP फ्रंट कॅमेरा उत्कृष्ट सेल्फी आणि व्हिडिओ कॉल अनुभव देतो.या डिव्हाइसमध्ये 6000mAh बॅटरी असून, ती 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट करते. एकूणच, जबरदस्त परफॉर्मन्स, दमदार बॅटरी आणि प्रीमियम फीचर्ससह OnePlus 13 सध्या बाजारातील सर्वोत्तम फ्लॅगशिप डील्सपैकी एक ठरत आहे.

हेही वाचा :
पुढच्या वर्षी सोन्याचे दर काय असतील? जाणून घ्या संभाव्य किंमती
निवडणुकीपूर्वी राजकीय भूकंप! करुणा मुंडेंची मनोज जरांगेंना ‘ती’ मोठी ऑफर!
खासदार राऊत यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर…