बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाण आता आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात करणार आहे. त्याचं लग्न ठरलं असून त्याची होणारी पत्नी कोण आहे आणि लग्नाची (Wedding)तारीख कधी आहे, याबाबतची सर्व माहिती आता समोर आली आहे.बिग बॉस मराठीच्या घरात आपल्या साध्या, प्रामाणिक आणि मनोरंजक स्वभावामुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आहे. शोमधील यशानंतर तो केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकला. जरी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नसली तरी सूरजचा चाहतावर्ग प्रचंड वाढला. सोशल मीडियावर त्याचे तब्बल 25 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

सूरज चव्हाणच्या लग्नाबद्दल गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. आता त्याची होणारी पत्नी सर्वांसमोर आली आहे. बिग बॉसची स्पर्धक अंकिता वालावलकरने त्यांच्या केळवणाचा व्हिडिओ शेअर केला, ज्यात सूरजसोबत संजना दिसली.या व्हिडिओत सूरजने खास उखाण्याच्या माध्यमातून तिचं नाव जाहीर केलं — संजना! चाहत्यांना ही जोडी अतिशय आवडली असून सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 29 नोव्हेंबर 2025 रोजी सूरज आणि संजना विवाहबद्ध होणार आहेत. त्यांचा पारंपारिक लग्नसोहळा पुण्याजवळील जेजुरी-सासवड परिसरात थाटात पार पडणार आहे. 28 नोव्हेंबरपासून हळद, मेहंदी आणि संगीतासारख्या विधींचा शुभारंभ होईल.सूरजच्या घरी लग्नाची (Wedding)जोरदार तयारी सुरू असून, घराची खास सजावट, नातेवाईकांची गर्दी आणि चाहत्यांच्या शुभेच्छांनी वातावरण आनंदी झाले आहे. लग्न पारंपारिक मराठमोळ्या पद्धतीने होणार असून त्यात नातेवाईक, मित्रमंडळी आणि बिग बॉस परिवारातील कलाकार उपस्थित राहतील, अशी चर्चा आहे.
सूरज चव्हाणचं लग्न लव्ह मॅरेज की अरेंज हा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ही जोडी काही काळापासून एकमेकांना ओळखत होती आणि कुटुंबाच्या संमतीनेच हा विवाह ठरविण्यात आला आहे. म्हणजेच हे अर्धं लव्ह आणि अर्धं अरेंज मॅरेज म्हणता येईल.सूरजने आपल्या करिअरप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यातही स्थिरतेचा निर्णय घेतला असून, त्याच्या नव्या प्रवासासाठी चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

हेही वाचा :
इचलकरंजीतील तीन शाळकरी मुली बेपत्ता…
हृतिक – सुझान यांच्या लग्नाबद्दल मोठं सत्य समोर…
मोबाईल वापरणे होणार महाग! ‘या’ कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन वाढणार