बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा सोमवारी सकाळपासून सोशल मीडियावर वेगाने पसरू लागल्या होत्या. या खोट्या बातम्यांमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आणि अनेकांनी श्रद्धांजली संदेशही पोस्ट केले. मात्र, काही तासांतच धर्मेंद्र यांच्या पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी तसेच मुलगी ईशा देओल यांनी पुढे येऊन या अफवांना फेटाळून लावत चाहत्यांना दिलासा दिला.ईशा देओलने आपल्या सोशल मीडियावर स्पष्ट केले की, “माझ्या वडिलांची तब्येत(health) स्थिर आहे आणि ते हळूहळू बरे होत आहेत.

कृपया अशा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा आणि त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करा.” या पोस्टनंतर धर्मेंद्र यांच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि सोशल मीडियावर ‘Get Well Soon Dharam Ji’ असा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला.यानंतर हेमा मालिनी यांनीही एक्स (पूर्वी ट्विटर) अकाउंटवर प्रतिक्रिया देत खोट्या वृत्तांवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी लिहिले, “उपचार घेत असलेल्या आणि बरे होत असलेल्या व्यक्तीबद्दल अशा प्रकारे खोटी बातमी पसरवणे हे अत्यंत गैरजबाबदार आणि अनादरयुक्त वर्तन आहे.
अशा अफवा पसरवणाऱ्यांना क्षमा नाही. कृपया धर्मेंद्रजी आणि आमच्या कुटुंबाच्या प्रायव्हसीचा आदर करा.”धर्मेंद्र सध्या किरकोळ आजारामुळे(health) उपचार घेत आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जवळच्या सूत्रांनी दिली आहे. चाहत्यांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा :
दुधी भोपळ्याची साल फेकून न देता सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटकदार सालीची चटणी
सांगलीत मित्राचा निर्घृण खून…
‘या’ निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र; भाजपची गोची