हिवाळ्यात बीट(beetroot) केवळ खाण्यासाठीच नव्हे तर सौंदर्य आणि घरगुती वापरासाठी देखील उपयुक्त ठरते, असे दिसून आले आहे. बीटामध्ये भरपूर पाणी, फायबर आणि लोह असल्यामुळे हे शरीरासाठी फायदेशीर आहे, तसेच हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत होते. बहुतेक लोक बीटाची साल काढूनच त्याचे सेवन करतात, परंतु बीटाच्या सालींमध्येही अनेक प्रकारचे फायदे दडलेले आहेत.

बीटाच्या सालीपासून फेस पॅक बनवता येतो. स्वच्छ केलेल्या सालांचा बारीक पेस्ट तयार करून त्यात थोडे गुलाबपाणी आणि बेसन मिसळून चेहऱ्यावर 10-15 मिनिटे लावल्यास त्वचा उजळते आणि डाग कमी होण्यास मदत होते. हिवाळ्यात फाटणाऱ्या ओठांसाठी बीटाच्या सालीपासून लिप टिंट बनवता येतो. वाळवलेल्या सालांचा रस काढून त्यात थोडे खोबरेल तेल मिसळून ओठांवर लावल्यास ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी आणि ओलसर राहतात.
बीटाच्या सालांचा(beetroot) बागकामात वापर करून सेंद्रिय कंपोस्ट तयार करता येतो. साल इतर भाज्यांच्या सालींसह मिक्स करून कंपोस्ट पिटमध्ये घालल्यास घरगुती सेंद्रिय खत तयार होते. तसेच, बीटाच्या सालीपासून हेअर पॅक तयार करून केसांवर लावल्यास कोंडा कमी होतो आणि नैसर्गिक टॉनिकसारखे काम करते. उकळवलेल्या सालांच्या पाण्याने केस धुतल्यास केस मजबूत आणि चमकदार राहतात.
बीटाच्या साली वापरण्यापूर्वी त्यांना चांगले धुवून घ्या आणि त्वचेसाठी वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करून घ्या, जेणेकरून अलर्जी किंवा पुरळ यासारख्या समस्या टाळता येतील. यामुळे बीटाच्या सालींचा बहुपयोग केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर सौंदर्य आणि घरगुती वापरासाठी देखील करता येतो.

हेही वाचा :
वाहनधारकांनो हाय सिक्युरिटी नंबर प्लेट संदर्भात महत्त्वाची बातमी!
शरद पवारांचे शिलेदार अजितदादांच्या गोटात…
‘या’ कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार नाही…