राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण(sisters) योजना पुन्हा चर्चेत आली आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांना दीड हजार रुपये दिले जातात. मात्र, योजनेतील काही अटींची पूर्तता न करणाऱ्या महिलांनाही लाभ मिळत असल्याचे समोर आले आहे. सरकारने योजनेच्या निकषानुसार ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असेल, ज्या महिलांच्या नावावर चारचाकी वाहन नसेल, वय 65 वर्षांपेक्षा कमी असेल आणि एका कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच लाभ दिला जाईल, अशा अटी घातल्या होत्या.

असे असूनही या निकषात बसत नसलेल्या महिलांनी लाभ घेतल्यामुळे आता सरकारने केवायसी बंधनकारक केलं आहे. केवायसीच्या माध्यमातून लाभार्थी महिलांची ओळख पटवली जाईल आणि निकषात बसत नसणाऱ्या महिलांची नावे योजनेतून वगळण्यात येणार आहेत. यामुळे काही विरोधकांकडून योजना बंद होणार असल्याचे आरोप करण्यात आले आहेत, ज्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
या शंका दूर करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे की, ‘कोणी माईचा लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणी(sisters) आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणे हेच आमचे काम आहे.’ त्यामुळे लाभार्थींना आता खात्री मिळाली आहे की, ही योजना सुरूच राहणार असून, योग्य महिलांपर्यंत निधी पोहोचवण्याचे काम सुरु राहील.

हेही वाचा :
भारताला भविष्यात कोणता धोका? रघुराम राजन यांचा इशारा…
कारला लागलेल्या आगीत 5 महिन्यांची गर्भवती जागीच ठार…
लग्नाच्या स्टेजवर नवरदेवावर चाकूने सपासप वार, जागीच कोसळली नवरी