ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (12 नोव्हेंबर) आरक्षण जाहीर करण्यात आले असून, यावर्षीच्या सोडतीत काही दिग्गज माजी नगरसेवकांना मोठा धक्का बसला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र पूर्वेश सरनाईक यांच्यासह भाजप, शिंदे गट आणि शरद पवार गटातील काही अनुभवी नगरसेवकांना या आरक्षणाचा फटका बसला आहे. त्यामुळे अनेकांना आता नवीन प्रभाग शोधावा लागणार असून, तिकीट मिळवण्यासाठी राजकीय गणिते नव्याने मांडावी लागणार आहेत.राम गणेश गडकरी रंगायतन येथे झालेल्या या आरक्षण सोडतीत ठाणेकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. यामध्ये अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (पुरुष), नागरिकांचा मागासवर्ग (महिला) आणि सर्वसाधारण महिला अशा विविध प्रवर्गांमध्ये आरक्षण निश्चित करण्यात आले. एकूण ६६ जागा महिला (woman)नगरसेविकांसाठी राखीव असल्याने ठाणे महापालिकेवर यावेळी महिलांचे वर्चस्व दिसून येणार आहे.

तथापि, काही दिग्गज नगरसेवकांना या सोडतीचा फटका बसला आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिंदे गटाच्या साधना जोशी यांना आरक्षणामुळे स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले आहे. प्रभाग 2 मध्ये भाजपाच्या कविता पाटील यांना, तर प्रभाग 3 मध्ये मधुकर पावशे यांना धक्का बसला आहे. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनाही आरक्षणाचा फटका बसला असला तरी त्या शेजारच्या वॉर्डातून निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे.प्रभाग 6 मध्ये शिंदे गटात गेलेल्या राष्ट्रवादीचे दिगंबर ठाकूर यांना महिला आरक्षणाचा फटका बसला आहे, तर प्रभाग 8 मधील देवराम भोईर यांनाही नवी जागा शोधावी लागणार आहे. अजित पवार गटाचे दिग्गज नजीब मुल्ला यांना प्रभाग 10 अ मध्ये, तर प्रभाग 11 मध्ये दिपा गावंड यांना आरक्षणामुळे अडचण निर्माण झाली आहे.
भाजपातील एकनाथ भोईर, सुर्वण कांबळे, मनीषा कांबळे (woman)आणि सुनील हंडोरे यांनाही अनुक्रमे प्रभाग 15 अ, 16 अ आणि 22 अ मध्ये आरक्षणाचा फटका बसला आहे. दिवा परिसरात बाबाजी पाटील आणि शरद पवार गटाचे शाणु पठाण यांना देखील या आरक्षणामुळे मोठा धक्का बसला असून, त्यांनी आपल्या नातलगांना तिकीट मिळवून देण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.एकूणच, ठाणे महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चिन्हे दिसत आहेत. महिला उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ठाणे महापालिकेवर यंदा “महिला सत्तेचा नवा अध्याय” लिहिला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा :
राजकीय नेत्याने केली मतांची मागणी, आजोबांनी झोळीत टाकला 1 रुपया मग जे घडलं…Video Viral
उद्धव ठाकरेंसमोर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत युतीचा प्रस्ताव, ‘भाजपाला…’
मोबाईल वापरकर्त्यांनो तुम्हालाही ‘हा’ मेसेज आला तर सावध व्हा