डिजिटल जगात फेसबुक(Facebook) वापरणाऱ्यांसाठी मोठा बदल येतोय. मेटाने जाहीर केलं आहे की 10 फेब्रुवारी 2026 पासून फेसबुकचे लाईक आणि कमेंट बटण बाह्य वेबसाइट्स, ब्लॉग्स आणि न्यूज पोर्टल्सवर दिसणार नाही. याचा अर्थ असा की युजर्स आता कोणत्याही लेखावर, पोस्टवर किंवा ब्लॉगवर थेट फेसबुकवर जाऊनच लाईक किंवा कमेंट करू शकतील; बाह्य वेबसाइटवर हे बटण उपलब्ध राहणार नाही. मात्र, फेसबुक अॅप आणि वेबसाइटवर लाईक आणि कमेंट फीचर्स अजूनही चालू राहतील.

फेसबुकने 2009 मध्ये लाईक बटण लाँच केले होते, जे काही वर्षांत सोशल मीडियाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य बनले. मेटाने हे बटण अनेक वेबसाइट्सवर एम्बेड केले होते, ज्यामुळे लोक त्यांच्या फेसबुक (Facebook)अकाउंटचा वापर करून तिथल्या पोस्टवर लाईक किंवा कमेंट करू शकत होते. मात्र, युजर्सची मोठी क्रिया आता थेट फेसबुक अॅपमध्ये होत असल्याने आणि जुने प्लगइन्स तांत्रिकदृष्ट्या जुने व कमी वापरले जात असल्याने मेटाने हा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीने स्पष्ट केले आहे की इंटरनेटवरील गोपनीयता नियम कठोर झाल्यामुळे जुने बटण प्रभावी राहिले नाही आणि आता टप्प्याटप्प्याने जुनी साधने काढून टाकली जातील. वेबसाइट मालकांसाठीही याचा त्रास होणार नाही; जुन्या कोड काढून टाकल्यास वेबसाइट्स अजून जलद आणि कार्यक्षम होतील. या बदलामुळे वापरकर्त्यांना फक्त थेट फेसबुकवर जाऊन अभिप्राय देण्याची आवश्यकता भासणार आहे, परंतु फेसबुकच्या मुख्य प्लॅटफॉर्मवर लाईक आणि कमेंट फीचर्स पूर्ववत राहतील.

हेही वाचा :
10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! शिक्षण मंडळाने घेतला अत्यंत महत्त्वाचा निर्णय
लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदेंकडून आनंदाची बातमी…
भारताला भविष्यात कोणता धोका? रघुराम राजन यांचा इशारा…