अलीकडेच गुगलवर Nano Banana ट्रेंड व्हायरल झाला होता. तेव्हा या ट्रेंडची(Gemini) संपूर्ण सोशल मीडियावर वेगळीच क्रेझ होती. युजर्स गुगल जेमिनीवर फोटो अपलोड करून वेगवेगळ्या अवतारात पोट्रेट तयार करत होते. कधी साडी प्रोट्रेट, तर कधी लेहेंगा. कधी dreamy Polaroid-style aesthetics तर कधी cinematic AI visuals. या सर्वांनी युजर्सच्या मनावर राज्य केलं होतं. आजही हा ट्रेंड युजर्समध्ये तितकाच लोकप्रिय आहे. इंस्टाग्राम, एक्स, व्हॉट्सअ‍ॅप या सर्व सोशल मीडियावर गुगल जेमिनी ट्रेंडची जादू पसरली होती.

आता नुकत्याच समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, Google आता एका मोठा निर्णय घेत आहे. कंपनी या Nano Banana चे नवीन वर्जन Nano Banana 2 लाँच करण्याचा निर्णय घेणार आहे. हे नवीन वर्जन आधीपेक्षा कितीतरी पट जास्त पावरफुल, स्टाइल-कंट्रोल्ड आणि क्रिएटिव फीचर्सने सुसज्ज असणार आहे.पहिले वर्जन Nano Banana ला Gemini AI suite अंतर्गत लाँच करण्यात आले होते आणि अगदी कमी काळात हे वर्जन फॅशन, आर्ट आणि फोटो एडिटिंग कम्युनिटीचे आवडते टूल ठरले. आता याचे नवीन वर्जन देखील लवकरच लाँच केले जाणार आहे.

नवीन वर्जन, ज्याला आता Nano Banana 2 (किंवा GEMPIX2, कारण ते अंतर्गत सिस्टम फाइल्समध्ये आढळले आहे) असे म्हणतात, ते गुगलच्या (Gemini)एआय क्रिएटिव्ह इकोसिस्टमला एका नवीन स्तरावर घेऊन जाणार आहे. टेक एक्सपर्ट्स आणि Gemini टेस्टर्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन वर्जनच्या सुरुवातीच्या झलक आधीपासूनच इंटरनेटवर दिसू लागल्या आहेत. ज्यामुळे असे संकेत मिळाले आहेत की, या नवीन वर्जनची रिलीज डेट आता जवळ आली आहे.

Google ने अधिकृतपणे अद्याप या फीचर्सचा खुलासा केला नाही. मात्र व्हायरल होत असलेल्या लीक्स आणि आंतरिक कोड्ससह ज्या काही गोष्टी समोर आल्या आहेत, त्या क्रिएटर्ससाठी अत्यंत मजेदार आहेत. नवीन Nano Banana 2 मध्ये काही नवीन अपग्रेड पाहायला मिळणार आहे.हाय-क्वॉलिटी इमेज जेनेरेशन: विझ्युअल्स आधीपेक्षा अधिक जास्त साफ, सिनेमॅटीक आणि फोटो-रियलिस्टिक असणार आहेत.

बेटर आर्टिस्टिक कंट्रोल: यूजर्स आता त्यांच्या विझुअल्समध्ये डेप्थ, मूड आणि टेक्स्चर अधिक चांगल्या पद्धतीने कंट्रोल करू शकणार आहेत.

फास्टर रेंडरिंग स्पीड: Gemini मध्ये इमेज क्रिएशन आता आणखी वेगवान होणार आहे, ज्यामुळे प्रोफेशनल डिजाइनर्सना मोठा फायदा होणार आहे.

AI-स्टाईल कन्सिस्टन्सी : इमेज आउटपुट प्रत्येक वेळी सौंदर्याच्या दृष्टीने सारखाच असेल, जो मागील आवृत्तीचा सर्वात मोठा कमकुवतपणा होता.

अ‍ॅडव्हान्स्ड क्रिएटिव्ह टूल्स: डिजिटल आर्टिस्ट्स आणि फॅशन क्रिएटर्ससाठी Gemini ecosystem मध्ये नवीन ब्रश आणि स्टाईल पर्याय जोडण्यात आले आहेत.

Google ने अद्याप याच्या लाँच डेटची घोषणा केली नाही. मात्र Nano Banana 2 चे पब्लिक लाँच 2026 च्या सुरुवातीला लाँच केवे जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

आवळा मधाचा वापर करून ‘या’ पद्धतीमध्ये बनवा टेस्टी चटणी

10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! शिक्षण मंडळाने घेतला अत्यंत महत्त्वाचा निर्णय

लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदेंकडून आनंदाची बातमी…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *