हिवाळ्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. याशिवाय शरीराला वेगवेगळ्या गंभीर आजारांची लागण सुद्धा होते. त्यामुळे हिवाळ्यात आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण वातावरणातील गारव्यामुळे सर्दी, खोकला आणि साथीच्या आजारांची शरीराला लागण होते. अशावेळी नियमित आवळ्याचे सेवन करावे. आवळा (amla)खाल्ल्यामुळे शरीरासह केसांना भरपूर पोषण मिळते. केसांची कमकुवत झालेली मूळ सुधारण्यासाठी नियमित आवळा खाण्याचा सल्ला दिला जातो.

याशिवाय शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी कोमट पाण्यात आवळा पावडर मिक्स करून प्यावी. यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीराला अनेक फायदे सुद्धा होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये आवळा मधाची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. आवळ्याची चटणी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यात तुम्ही झटपट आवळ्याची चटणी बनवू शकता. आवळ्याची चटणी चपाती किंवा भाकरीसोबत अतिशय सुंदर लागते. जाणून घेऊया रेसिपी.

साहित्य:
आवळा
मध
आलं
हिरवी मिरची
काळे मीठ
भाजलेल्या जिऱ्याची पावडर

कृती:
आवळ्याची (amla)चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, आवळे काहीवेळा पाण्यात तसेच ठेवून द्या. त्यानंतर आवळे स्वच्छ धुवून घ्या.स्वच्छ करून झाल्यानंतर आवळ्याचे बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाका. त्यानंतर त्यात आल्याचा तुकडा, हिरवी मिरची, काळे मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि चवीनुसार मध घालून चटणी वाटून घ्या.
तयार केलेली चटणी काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. आवळ्याची चटणी बनवताना त्यात पाणी अजिबात घालू नये. यामुळे चटणी खराब होण्याची शक्यता असते.

आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विटामिन सी आढळून येते. विटामिन सी युक्त आवळ्याचे सेवन केल्यास केसांच्या वाढीसोबतच त्वचा सुद्धा चमकदार आणि सुंदर होते. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी आवळ्याचे सेवन करावे. मध खाल्ल्यामुळे त्वचेचा रंग उजळदार होतो. यात अँटीऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरिअल आणि ऊर्जा देणारे गुणधर्म आढळून येतात. आवळ्याच्या चटणीचे सेवन गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सुद्धा करू शकता.

हेही वाचा :

कोणाचाही कितीही सुंदर फोटो असला तरी तुम्ही लाइक करू शकणार नाही…Facebook चा मोठा निर्णय; ते बटन आता …
10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! शिक्षण मंडळाने घेतला अत्यंत महत्त्वाचा निर्णय
लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदेंकडून आनंदाची बातमी…



By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *