लाडकी बहीण योजनेबाबत(scheme) महत्त्वाची माहिती समोर आली असून सर्व लाभार्थ्यांसाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. सरकारने यासाठी १८ नोव्हेंबर ही शेवटची तारीख निश्चित केली असून उद्या अखेरचा दिवस आहे. केवायसी पूर्ण न करणाऱ्या लाभार्थींना पुढील हप्त्यांचा लाभ मिळणार नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सध्या राज्यातील सुमारे १ कोटी १० लाख महिलांची केवायसी प्रक्रिया बाकी असून या मोठ्या संख्येमुळे अनेक लाभार्थी महिलांमध्ये लाभ बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. योजनेची अंमलबजावणी सुरू होऊन दीड वर्ष होत असून सध्या अडीच कोटींहून अधिक महिलांना दरमहा १५०० रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. लाभ सुरळीत सुरू राहण्यासाठी केवायसी तातडीने करून घेण्याचे आवाहन सरकारने केले आहे.
लाडकी बहीण(scheme) योजनेतील केवायसी प्रक्रियेची अंतिम मुदत आता काहीच तासांवर आली असताना, अजूनही सुमारे १ कोटी महिलांचे केवायसी बाकी असल्याने लाभार्थ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. इतक्या मोठ्या संख्येने केवायसी पूर्ण करणे अशक्य असल्याने मुदतवाढ देण्याची मागणी जोर धरत आहे. सरकार याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर दिवशी ५ लाख महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण होते, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. आतापर्यंत १ कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण झाली असली तरी अजूनही कोट्यवधी महिलांचे प्रमाणीकरण शिल्लक आहे.
दरम्यान, केवायसी न केल्यास पुढील महिन्यापासून योजनेचा आर्थिक लाभ मिळणार नाही. त्यामुळे उर्वरित महिलांमध्ये मोठी धांदल उडाली आहे. आता सरकार मुदतवाढ देते का, की निश्चीत केलेल्या अंतिम तारखेलाच निर्णय कायम ठेवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :
कोल्हापूरातील रांगोळी मधील सेवा संस्थेचे अध्यक्ष अपघातात ठार…
भीषण अपघात; तब्ब्ल ‘इतक्या’ भारतीयांचा मृत्यू…
आज पुन्हा स्वस्त झालं सोनं; वाचा 24 कॅरेटचा दर