डिजिटल ट्रान्झॅक्शनचाच वापर आता जवळपास दर दुसरी व्यक्ती करताना दिसत असली तरीही काही मंडळी मात्र ATM मधूनच रोकड काढत खर्चासाठी ती वापरण्याची सवय बाळगतात. बऱ्याच आर्थिक व्यवहारांसाठी आतासुद्धा रोकड वापरली जाते. एटीएममधून (ATM)पैसे काढणं ही बाब आता नवी राहिलेली नाही. मात्र या मशिनमधून पैसे काढताना काही गोष्टींची काळजी घेतली जाणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण, क्षुल्लक चुकांमुळं पैसे काढणं महागात पडू शकतं असं सांगणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्यानुसार एटीएममधून पैसे काढण्यापूर्वी त्यावर असणारं ‘Cancel’ बटण दोनदा दाबल्यास हॅकर्सना दणका मिलतो असं म्हटलं गेलं आहे. व्हायरल मेसेजनुसार मशीमध्ये डेबिट कार्ड टाकण्याआधी कॅन्सल बटण दाबल्यास ‘स्कॅमिंग डिवाईस डिअॅक्टीव्ह’ अर्थात निष्क्रीय होते.व्हायरल मेसेजमध्ये असाही दावा केला जात आहे की, असं केल्यानं वापरकर्त्यांचा Pin चोरी होणार नाही. इतकंच नव्हे तर मशिनसोबत केली जाणारी कोणतीही तांत्रिक छेडछाडही यामुळं थांबवता येते. हा मेसेज व्हायरल असून तो सध्या बरीच मंडळी आपल्या वर्तुळात Forward करत आहेत.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ आणि मेसेज पाहून आता सरकारलाच यामध्ये हस्तक्षेप करावा लागला आहे. पीआयबी च्या वतीनं यासंदर्भात काही गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या असून, व्हिडीओत दाखवण्यात येणारी दृश्य आणि देण्यात येणारा संदेश 100 टक्के चुकीचा असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.RBI नंसुद्धा यासंदर्भातील स्पष्टीकरण देत अशा कोणत्याही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या नसल्याचं म्हणत Cancel बटणाचं एकमेव काम असून, ते म्हणजे Transaction मध्ये काही घोळ झाल्यास ते रद्द करणं. हॅकिंग किंवा तत्सम कोणत्याही गोष्टीचा याच्याशी संबंध नाही असंही स्पष्ट करण्यात आलं.
एटीएमच्या(ATM) माध्यमातून अनेकदा आर्थिक फसवेगिरीच्या घटना घडतात. जिथं मशीनमध्ये कार्ड स्लॉटमध्ये ‘स्किमिंग डिवाइस’ लावण्यात येते. यामध्ये कीपॅडवर फेक ओवरले लावून लहानसा कॅमेरा लावण्यात येतो. ज्यामुळं कार्डची माहिती आणि पिन चोरट्यांना मिळवता येतो.
एटीएम वापरताना फॉरवर्डेड मेसेजवर विश्वास ठेवण्यापेक्षा काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. ज्यामध्ये सर्वप्रथम मशिनमध्ये कार्ड टाकण्यापूर्वी स्लॉट वारंवार हलवून पाहावा. त्यावर काही चिकटवल्याचं लक्षात येताच मागे व्हा. बँकेला तताडीनं याची माहिती द्या. SMS आणि ईमेल अलर्ट कायमच सुरू करा. ज्यामुळं तुम्हाला प्रत्येक वेळी आर्थिक व्यवहारांची माहिती मिळेल. एटीएमचा पिनकोड दर 3 ते 6 महिन्यांनी बदला. 1234, 0000, किंव जन्मतारखा असे सोपे पिनकोड ठेवू नका. ATM कार्ड हरवल्यास तातडीनं बँकेच्या हेल्पलाईन क्रमांकावर Call करत कार्ड ब्लॉक करून घ्या.

हेही वाचा :
टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! आता कर्णधारच संघाबाहेर
अल फलाह विद्यापीठ दहशतवाद्यांची फॅक्टरी?
ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप