बॉलिवूड ड्रग्ज(drug) प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने ताब्यात असलेल्या अडीचशे कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्ज प्रकरणातील आरोपी मोहम्मद सलीम सुहेल शेख यांनी अनेक बॉलिवूड कलाकारांची आणि राजकीय नेत्यांची नावे घेत धक्कादायक खुलासा केला होता. आता या प्रकरणात पोलिसांच्या हाती काही ठोस पुरावे लागल्याचे समोर आले असून, संबंधित मंडळींची चौकशी होणार आहे.

या प्रकरणात सर्वप्रथम इन्फ्लुएन्सर ओरी उर्फ ओरहान याला समन्स पाठवण्यात आले आहे. ओरीला आज, गुरुवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. ओरी बॉलिवूड सेलिब्रिटींच्या पार्टीत(drug) सतत दिसत असल्याने सोशल मीडियावर त्याच्याबाबत उत्सुकता वाढली होती.
पोलिसांच्या चौकशीत सलीमने खुलासा केला की, त्याने अभिनेत्री श्रद्धा कपूर, तिचा भाऊ सिद्धार्थ कपूर, निर्माता-निर्देशक अब्बास-मस्तान, माजी आमदार झिशान सिद्दिकी, अभिनेत्री-नृत्यांगना नोरा फतेही, इन्फ्लुएन्सर ओरी, हसीना पारकरचा मुलगा अलीशाह पारकर, रॅपर लोका आणि इतरांसाठी देश-विदेशात ड्रग्ज पार्टी आयोजित केल्या आहेत आणि त्यांना अंमली पदार्थ पुरवले आहेत.
गेल्या काही वर्षांत ओरी सोशल मीडियावर बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत पार्टी करताना दिसून लोकप्रिय झाला आहे. मात्र आता या प्रकरणामुळे त्याच्या कारवायांबाबत सखोल चौकशी होणार असल्याने, फॅन्समध्ये आणि मीडिया मध्ये मोठी चर्चा सुरु आहे.

हेही वाचा :
हार्दिक पांड्याने गुपचपू केलं लग्न? गर्लफ्रेंड माहिकासोबत…
हसन मुश्रीफ यांच्या विरोधात प्रकाश आबिटकर
जाणून घ्या आजचे राशिभविष्य…