बॉलिवूड अभिनेत्री(actress) ऐश्वर्या राय नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे चर्चेत असते. मात्र यावेळी ती खासगी आयुष्यामुळे नव्हे तर जाती आणि धर्मावरील भावूक विधानामुळे चर्चेत आली आहे. नुकतीच ती आंध्र प्रदेशातील पुट्टपार्थी येथे झालेल्या श्री सत्य साई बाबा यांच्या शताब्दी समारंभाला उपस्थित राहिली. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी , अनेक केंद्रीय मंत्री आणि दिग्गज नेतेसुद्धा उपस्थित होते. ऐश्वर्या राय पहिल्यांदाच नरेंद्र मोदींसोबत एकाच मंचावर बोलताना दिसली आणि या भाषणादरम्यान ती भावूक झाली.

ऐश्वर्या राय(actress) तिच्या संपूर्ण कुटुंबासह सत्य साई बाबा यांच्या भक्तीत लीन आहे. आयुष्यातील अनेक मोठे निर्णय तिने सत्य साई बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली घेतल्याचे तिने उघड केले आहे. शताब्दी सोहळ्यातील भाषणादरम्यान तिने बाबा यांच्या शिकवणीची आठवण करून दिली आणि मानवतेचा संदेश दिला. भाषणानंतर ऐश्वर्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतलेला व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
श्री सत्य साई बाबा यांच्या शताब्दी कार्यक्रमात ऐश्वर्या राय म्हणाली, “बाबा नेहमी सांगायचे की जगात फक्त एकच जात आहे आणि ती म्हणजे मानवतेची जात. धर्मदेखील एकच आहे. प्रेमाचा धर्म. देवही एकच आणि सर्वव्यापी आहे. भाषाही एकच आहे. हृदयाची भाषा.” तिचे हे विधान ऐकून उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.तिने पुढे सांगितले की बाबा यांच्या शिकवणीने तिचा जीवनमार्ग बदलला आहे. प्रेम, शांतता आणि एकत्वाचा संदेश देण्यासाठी अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणे आपल्यासाठी भाग्याची बाब असल्याचेही तिने सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाचे महत्त्व अधिक वाढले, असेही ती म्हणाली.
मागील काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात दुरावा असल्याच्या चर्चा जोरात आहेत. मात्र, ऐश्वर्याने पुन्हा एकदा या चर्चांना प्रतिसाद देण्यास नकार दिला आहे. खासगी आयुष्याबद्दल तिने अनेकदा मौन पाळले असून या कार्यक्रमातही तिने केवळ अध्यात्म, एकता आणि मानवतेवरच भाष्य केले.ऐश्वर्याने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले असून ती आजही इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. मोठ्या संपत्तीची मालकीन असतानाही ती अध्यात्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहते आणि बाबा यांच्या शिकवणीचे पालन करते हे विशेष.

हेही वाचा :
नवी मुंबईत ‘या’ एरियात दिसला बिबट्या! Video समोर, स्थानिकांमध्ये दहशत
सेलिब्रिटींचा यारों का यार ओरी अडचणीत; 252 कोटींच्या ड्रग्ज पार्टी प्रकरणात…
हार्दिक पांड्याने गुपचपू केलं लग्न? गर्लफ्रेंड माहिकासोबत…