कोल्हापूर : कागलच्या राजकारणात(politics) आता आणखी तिखट वळण आले आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांनी जोरदार प्रवेश केला असून संजय मंडलिक यांचा गट अबिटकरांच्या पाठिशी उभा राहिला आहे. सध्या, मंडलिक-आबिटकर गटाने आपले उमेदवार अज्ञात स्थळी हलवून ठेवले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर ते प्रचारासाठी परत येणार आहेत. दि. 21 नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची मुदत असून अपील असलेल्या प्रकरणात ही तारीख 25 नोव्हेंबर आहे.

यापूर्वी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ विरुद्ध प्रकाश अबिटकर व संजय मंडलिक यांच्यात उघड संघर्ष झाला होता. त्या पॅनेलमध्ये बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, संजय मंडलिक व पालकमंत्र्यांचे भाऊ अर्जुन आबिटकर विजयी झाले होते. आत्ताच्या राजकीय घडामोडींचा आढावा घेतल्यास मुश्रीफ आणि मंडलिक यांच्यात पूर्वी चांगलीच जवळीक होती; मात्र आता आबिटकर यांच्या प्रवेशामुळे राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले आहे.कागल नगरपालिकेत हसन मुश्रीफ व संजय घाटगे विरुद्ध समरजित घाटगे व संजय मंडलिक असा संघर्ष अपेक्षित होता; मात्र अनपेक्षितपणे मुश्रीफ व समरजित घाटगे एकत्र आले आणि आता या वळणामुळे छोटे छोटे राजकीय धक्के बसत आहेत.

महायुतीच्या सरकारमध्ये दोन मंत्री एकमेकांविरोधात उभे राहणे हा अत्यंत दुर्मीळ प्रकार मानला जात आहे. मुश्रीफ यांचा अपेक्षाभंग झाल्यापासून आबिटकरांशी त्यांचा संघर्ष सुरू आहे. निवडणुकीपूर्वी(politics0 पालकमंत्रिपदाच्या जेष्ठतेच्या मुद्द्यावर मुश्रीफ यांना प्राथमिकता असण्याची अपेक्षा होती; मात्र राष्ट्रवादी पक्षाच्या संख्याबळामुळे पालकमंत्रिपद आबिटकरांनाच मिळाले. यामुळे सर्किट हाऊसमधील प्रतिष्ठेच्या भुदरगडच्या सूटवरुन दोघांमध्ये तणाव निर्माण झाला.

राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, सध्याच्या राजकीय संघर्षावर राज्य पातळीवर कुणी वरिष्ठ नेता लक्ष देईल असे दिसत नाही. कागलच्या राजकारणात सध्या राजकीय भूकंपानंतर लहान धक्के बसत आहेत, आणि या राजकीय खेळात पुढील काही दिवस अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत.

हेही वाचा :

 जाणून घ्या आजचे राशिभविष्य…

या ठिकाणी स्वास्तिक काढण्याची कधीच करू नका चुक, नाहीतर होईल पश्चात्ताप

अक्रोड भिजवून खाल्ल्यास होतील हे फायदे..

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *