महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्यांचे(Leopard) हल्यांच्या बातम्या समोर येत असून रोज कुठे ना कुठे बिबट्या दिसल्याचे व्हिडीओ समोर येत आहेत. पुण्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरुर आणि जुन्नरसारख्या तालुक्यांबरोबरच नाशिकमधील काही तालुक्यांमध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे. बुधवारी नागपूरमधील एका घरात शिरलेला बिबट्या जेरबंद करताना वनविभागाची कसरत झाली. विशेष म्हणजे आता केवळ ग्रामीण भागांमध्ये बिबट्याचा वावर मर्यादित राहिला नसून शहरी भागांमध्येही बिबटे दिसू लागलेत. आत तर नवी मुंबईत बिबट्या दिसल्याची माहिती समोर आली आहे.

मंगळवारी म्हणजेच 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी नवी मुंबईतल्या खारघरमध्ये बिबट्याचं दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. खारघरच्या टेकडीवर म्हणजेच खारघर डोंगरावर बिबट्या दिसून आला. येथील चाफेवाडी पाड्याजवळ ग्रामस्थांनी प्रत्यक्षात बिबट्या पाहिल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे चाफेवाडी आणि फणसवाडी पाड्यातील रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.खारघर डोंगरावर रोपलागवड झाल्यामुळे घनदाट जंगल तयार झालं आहे, त्यामुळे येथे बिबट्यांचा मुक्त संचार वाढला आहे. चार महिनेपूर्वीही याच भागात बिबट्या(Leopard) दिसला होता, तेव्हा वन विभागाने शोध घेतला पण सापडला नव्हता. आता पुन्हा दिसल्यामुळे वन विभाग सतर्क झाला आहे. वन परिक्षेत्र अधिकारी गजानन पांढरपट्टे यांनी सांगितलं की, लवकरच पाड्यात पाहणी करून योग्य उपाययोजना केल्या जातील.

सीसीटीव्ही, पिंजरे लावणे किंवा ट्रँक्विलायझरचा वापर करुन बिबट्याला जेरबंद करण्याचा विचार सुरु असल्याचं समजतं. सोशल मीडियावर खारघर हिल्स परिसरात दिसलेल्या बिबट्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.खारघर परिसरातील लोकांनी काही गोष्टींबद्दल काळजी घेणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलं आहे. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी डोंगरावर अथवा जंगलाजवळ न फिरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. लहान मुलांना एकट्याने फिरू देऊ नका. कुत्रे-मांजरी घरांबाहेर फिरत ठेवू नका, असं सांगण्यात आलं आहे.

सोप शिकार म्हणून कुत्र्या-मांजरीच्या मागे लागून बिबटे मानवी वस्तीपर्यंत पोहोचतात असं अनेक उदाहरणांमधून दिसून आलं आहे. पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने बिबटे मानवी वस्तीत शिरतात. त्यामुळे प्राण्यांना मोकाट सोडू नये. त्याचप्रमाणे बिबट्या दिसला तर धावू नका, हळूहळू मागे सरका आणि आवाज करा, असं वनविभागाच्या इशाऱ्यामध्ये म्हटलं आहे.खारघर, पनवेल, उरण भागात गेल्या काही वर्षांत बिबट्यांचा वावर वारंवार आढळतोय. या ठिकाणी मानवी वस्ती जंगलाला लागूनच आहे. पण राज्यभरात बिबट्यांची दहशत असताना बिबट्या दिसल्याचा हा प्रकार दोन दिवसांपूर्वीच घडला आहे. त्यामुळे येथे भीतीचं वातावरण असून आजही वन विभागाची टीम येथे तैनात आहे.

हेही वाचा :

सेलिब्रिटींचा यारों का यार ओरी अडचणीत; 252 कोटींच्या ड्रग्ज पार्टी प्रकरणात…

हार्दिक पांड्याने गुपचपू केलं लग्न? गर्लफ्रेंड माहिकासोबत…

हसन मुश्रीफ यांच्या विरोधात प्रकाश आबिटकर

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *