राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या(elections) निमित्ताने अनेक राजकीय समीकरणं पाहायला मिळत आहेत. एरव्ही एकमेकांवर कुरघोडी करणारे पक्ष हातात हात घालून निवडणूक लढत आहेत. दरम्यान कणकवलीमध्ये नगरपरिषद पंचायत समित्याच्या निवडणुकांमध्ये राणे बंधू आमने-सामने आले आहेत. नितेश राणे आणि निलेश राणे आमने-सामने आल्याने आता ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. कणकवलीत भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र आहे. तर दुसरीकडे शिंदेंची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अशी अनोखी युती होत शहर विकास आघाडी स्थापन झाली आहे. भाजपकडून मंत्री नितेश राणे आणि शिवसेनेकडून आमदार निलेश राणे मैदानात आहेत.

निलेश राणेंनी माजी आमदार राजन तेलींच्या घरी शहर विकास आघाडीच्या नेत्यांना एकत्र करत शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी त्यांनी भाषणही केलं. मित्रपक्षावर पातळी सोडत टीका करणार नाही, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे. तसंच नारायण राणेंनी आपल्याला ज्या पक्षात असतो तिथे 100 टक्के द्यावं असं सांगितलं. त्यामुळे आम्ही दोघे बंधू त्या त्या पक्षाला 100 टक्के देतो असं म्हटलं आहे.आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला, तो यशस्वी झाला नाही. त्यांना आमच्यासोबत युती करायची नव्हती. ज्यांना आमच्यासोबत युती करायची आहे त्यांच्यासोबत युती झाली. म्हणून मी प्रचारासाठी कणकवली मध्ये आलो आहे असं निलेश राणेंनी सांगितलं आहे. आमच्या स्टार प्रचारकांची 40 ची यादी आहे, कोणी येऊ शकतात. नाव नंतर जाहीर करू. आम्ही शहर विकास आघाडीला निवडून आणण्यासाठी आम्ही सक्रिय झालो आहोत असंही त्यांनी जाहीर केलं.
युतीसंदर्भात भाष्य करताना त्यांनी सांगितलं की, “जो निर्णय झाला तो जिल्ह्यातून झालेला नाही. ते (नितेश राणे) जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. महायुती तोडण्याचा निर्णय बाहेरुन झाला आहे. जे निर्णय घेतले ते भाजपाच्या वरच्या स्तरावर झाले आहेत. आम्हाला जे करायचं होतं त्यासाठी आम्ही बराच वेळ थांबलो. पण भाजपाच्या वरच्या नेत्यांचा निर्णय होत नव्हता. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. आम्ही राणे साहेबांना सांगून हा निर्णय घेतला आहे. राणे साहेब भाजपातच आहेत. साहेब म्हणाले आता तुम्ही थांबू नका, तुम्ही तुमचा निर्णय घ्या”.”राणे साहेब अजूनही युतीसाठी आग्रही आहेत. आता युती होईल अस वाटत नाही आणि साहेबांनी (नारायण राणे) आता तुम्ही थांबू नका तुमचाही मोठा पक्ष आहे अस सांगितलं आहे. वेळोवेळी किती लोकांनी प्रयत्न केले. किती दिवस आणि किती बैठका घ्यायच्या त्याला काही तरी मर्यादा आहेत. जे उत्तर आलं ते समाधानकारक आले नाही. शिवसेनेला जिथे चांगलं वातावरण आहे तिकडे आम्ही उमेदवारांना पाठिंबा देणार,” असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
नारायण राणे युती तोडणार असं विधान मी ऐकलं नाही(elections). राणेसाहेब असं बोलले नाहीत. राणे साहेबांची आणि शिंदे साहेबांची परवानगी घेऊन आम्ही इकडे आलेलो आहोत. लपून छपून नाही ही शहर विकास आघाडी निवडून आणण्यासाठी जेवढ योगदान द्यायचं आहे तेवढं देणार असंही ते म्हणाले आहेत. हा पॅटर्न राज्यभर देखील होऊ शकतो असं सूचक विधानही त्यांनी केलं आहे.नितेश राणेंचं कौतुक करताना त्यांनी, जो निर्णय झाला तो जिल्ह्यातून झालेला नाही ते (नितेश राणे) पालकमंत्री आहेत. नातं असतं ते तुटत नाही, तुटणारही नाही. भाजपाच्या वरच्या स्तरातून निर्णय घेतले गेले असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा :
नवी मुंबईत ‘या’ एरियात दिसला बिबट्या! Video समोर, स्थानिकांमध्ये दहशत
सेलिब्रिटींचा यारों का यार ओरी अडचणीत; 252 कोटींच्या ड्रग्ज पार्टी प्रकरणात…
हार्दिक पांड्याने गुपचपू केलं लग्न? गर्लफ्रेंड माहिकासोबत…