उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरुन उपहासात्मकपणे टीका (killed)केली असून, एक कोणीतरी बाबा मला मारलं म्हणून दिल्ली गेले असा टोला नाव न घेता लगावला आहे. तसंच जे दिवटे निघाले आहेत त्यांना मशालीचे महत्त्व समजणार नाही अशी टीकाही एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेत्यांवर केली आहे. त्यांच्यात आपलाल्या नसा आवळणं सुरु झालं आहे असंही ते म्हणाले. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेकडून डिजिटल बोर्ड वाटप करण्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.”मी कार्यक्रम छोटा की मोठा नाही हे बघत नाही, तर कामाची साईज बघतो. आयुष्यात चांगले शिक्षक आणि शिक्षण नाही मिळालं तर काय होतं हे दिसत आहे. दिवटी म्हणजे मशाल आणि दिवटा म्हणजे…,” असं उद्धव ठाकरेंनी म्हणताच एकच हशा पिकला. “असे जे दिवटे निघाले आहेत, त्यांना मशालीचे महत्व समजणार नाही आणि कळलेलं नाही असा टोला त्यांनी शिंदेंच्या सेनेला लगावला.

‘शिवसेनेच्या माध्यमातून शिक्षक मतदारसंघातून तुम्ही निवडून दिलेला लोकप्रतिनिधी काही वाह्यातपणा न करता आणि शिक्षक म्हणून विधानपरिषदेतही आणि कामात सुद्धा एक वेगळा ठसा उमटवत (killed)आहे. तुमचा आमदाराकीचा निधी फक्त शिक्षणासाठी वापरा. हा निधी विरोधी पक्षाचा आमदार म्हटल्यानंतर मुठी आवळल्या, नाड्या आवळल्या हे आपण पेपरमध्ये वाचत असतो,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.शिंदेंच्या शिवसेना नेत्यांची नाराजी आणि दिल्ली दौऱ्यावर टीका करताना ते म्हणाले की, “आता कहर म्हणजे त्यांच्यात आपलाल्या नसा आवळणं सुरु झालं आहे. एक कोणीतरी बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला गेले आहेत. ही लाचारी का, तर चांगला शिक्षक त्या वयात मिळाला असता तर ही परिस्थिती आली नसती. त्यांना मिळाला असता तर हे झाले नसते”.
भाजपने शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना फोडून पक्ष प्रवेश दिल्यानंतर नाराज झालेल्या शिवसेनेने मित्र पक्षातील काही असंतुष्ट पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याची रणनीती आखली होती. 22 तारखेला मित्र पक्षातील या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सोहळा घ्यावा अशी विनंती या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. परंतु, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आाणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गेल्या दोन दिवसांत झालेल्या चर्चेनंतर हे सर्व संभाव्य प्रवेश रोखण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. महायुतीत वितुष्ट येईल असं कोणतंही काम करू नका असे शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना बजावले आहे. हे पक्षप्रवेश प्रामुख्याने ठाणे, रत्नागिरी, मराठवाडा, नवी मुंबई, रायगड या भागातले होते.
अमित शाह यांनी या चर्चेरदरम्यान एकनाथ शिंदेंना महाराष्ट्रातील ब-याच गोष्टीवर माझं लक्ष आहे असं सांगितलं. तसंच तुम्ही एऩडीएचे प्रमुख पक्ष आहात. तुमचा सन्मान राखला जाईल असं आश्वासनही दिलं आहे.

हेही वाचा :
प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनीने एकत्र येत दिली गूडन्यूज
भाच्यासोबत खोलीत होती बायको, अचानक आला नवरा…
मराठी बोलता येत नाही का?’ विचारत ट्रेनमध्ये मारहाण