अभिनेत्री(Actress) शर्लिन चोप्रानं बॉलिवूडच्या अगदी मोजक्याच सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण तिची चर्चा मात्र सगळीकडे कायमच असते. शर्लिन चोप्राचा कधी लूक तर कधी तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे अनेकदा चर्चेत असते. तसेच, तिचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण, सध्या शर्लिन चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आली ती, एका वेगळ्याच मुद्द्यामुळे. अभिनेत्री शर्लिन चोप्रानं ब्रेस्ट इम्प्लांट केली. तसेच, तिनं तिच्या ब्रेस्टमधून सिलिकॉन कप्स काढून टाकले आहेत. तसेच, तिनं सर्वांना आवाहन केलंय की, स्वतःच्या शरीराशी अजिबात छेडछाड करू नका.

बॉलिवूड मध्ये काम जास्त मिळेल त्यासाठी ब्रेस्ट इंप्लाट करायला मला सांगितल, मी ते केले देखील. 825 ग्रॅमचे सिलिकॉनचे दोन कप माझ्या सोबत मागील 5 वर्षापासून होते, असं शर्लिन चोप्राने (Actress)सांगितलं.मला हळू हळू यामुळे खूप त्रास झाला, ब्रेस्ट इंप्लांट केल्यानंतर मला त्रास असह्य झाला मी पेनकिलर गोळ्या दिवसा आड घ्यायचे. सुंदर दिसण्यासाठी आपण आपल्या शरीसरसोबत खूप खेळ करतो. मी आता खऱ्या जगात राहणार हे इंप्लांट काढून मी आता खर जगणार,मी खूप खोट जगत होते, हे शर्लिन चोप्राने मान्य केलं. खरतर सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी हे सगळं करावे लागते. पण मला आता एक गोष्ट लक्षात आली आहे आपल्या आरोग्य शिवाय कोणतीच गोष्ट महत्वाची नाही, असं शर्लिन चोप्रा सांगते.
ब्रेस्ट इंप्लांट केल्यानंतर मी जिम, स्विमिंग, घरातले काम आणि स्वयंपाक देखील केले नाही. कारण मला एवढा त्रास झाला की मागील काही वर्षात हे काहीच करू शकले नाही. पण आता हे काढल्यानंतर मी माझ आयुष्य खऱ्या अर्थाने जगणार आहे. या जगात राहण्यासाठी कोणीच आपल्या शरीरासोबत खेळू नका या सोशल मीडियासाठी हीच विनंती मी सगळ्यांना करते.इम्प्लांट्स काढल्याबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देताना शर्लिन म्हणाली, “मला खूप हलकं वाटतंय, फुलपाखरासारखं. माझ्या छातीवर दोन पर्वत असल्यासारखं वाटत नाही. असं वाटतंय की मी वेदना आणि मी ज्या ज्या गोष्टींशी झुंजत होते त्या सर्वांपासून मुक्त झालो आहे. चिडचिड, मूड स्विंग्स… मला अनेक समस्यांपासून मुक्तता मिळाली आहे.”
तिला आता ती प्रतिमा बदलावी लागेल का असे विचारले असता, ती पुढे म्हणाली, “तिला वाटते की तिला सेक्स सिम्बॉल म्हणून आधीच तयार केलेली प्रतिमा बदलावी लागेल का.” शर्लिन म्हणाली, “बघा, सेक्स सिम्बॉल बनण्यासाठी इतके जड ब्रेस्ट इम्प्लांट्स घेणे आवश्यक नाही. सेक्सी असणे ही मनाची एक अवस्था आहे.”

हेही वाचा :
कुरुंदवाडात ‘टीईटी’ परीक्षेच्या तणावातून विवाहितेने संपवले जीवन
पेन्शनचा आकडा वाढणार, कोण ठरणार थेट लाभार्थी?
गरोदर महिलेला स्कुटरने ओढत नेलं, पोलिसांकडूनच घडले गैरवर्तन; Video Viral