बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर ही दिग्दर्शक लक्ष्मण उतरेकर यांचा पुढील चित्रपट ‘ईथा’ ची शूटिंग करत आहे. मात्र यादरम्यान श्रद्धाच्या फॅन्ससाठी एक बातमी समोर आलीये. मीडिया रिपोर्ट्सनुसार शूटिंग(shooting) दरम्यान श्रद्धाला दुखापत झाली असून त्यामुळे दोन आठवड्यांपूर्वी शूटिंग थांबवण्यात आली आहे. सध्या श्रद्धा ही तमाशा कलाकार विठाबाई भाऊ मांग नारायणगांवकर यांच्यावर आधारित चित्रपटात प्रमुख भूमिका निभावतेय. नाशिक येथे चित्रीकरण सुरु असताना श्रद्धाला दुखापत झाली ज्यामुळे तिला फ्रॅक्चर झालं आणि परिणामी शूटिंग थांबवाव लागलं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लावणी नृत्य करत असताना अभिनेत्री श्रद्धा कपूरने नऊवारी साडी, दागिने आभूषण, कमरपट्टा इत्यादी सगळं परिधान केलं होतं आणि खूप वेळ त्यातील डान्स सीक्वेंसची शूटिंग करत होती. अजय अतुलच्या गाण्यावर अनेक टेक घेतल्यावर अचानक तिने संपूर्ण वजन डाव्या पायावर टाकलं आणि तिचा बॅलेंस बिघडला ज्यामुळे तिला दुखापत झाली. महाराष्ट्राच्या दिग्गज लावणी सम्रादनी विठाबाई भाऊ मांग नारायणगांवकर यांच्या भूमिकेसाठी 15 किलो पेक्षा जास्त वजन वाढवलं.
सूत्रांच्या माहितीनुसार, श्रद्धा मुंबईत परतल्यावर मड आयलंड सेटवर काही इमोशनल सीन्स शूट करण्यासाठी पोहोचली. मात्र तिचं दुखणं वाढल्यामुळे शुटिंग (shooting)थांबवावी लागली. टीम दोन आठवड्यांनंतर पुन्हा शूटिंग सुरू करण्याची योजना आखत आहे, तोपर्यंत श्रद्धा पूर्णपणे बरी होईल.’छावा’ या प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा अधिकृतपणे अद्याप केलेली नाही. मात्र १ नोव्हेंबर पासून त्यांच्या चित्रपटाची शूटिंग सुरु करण्यात आली. पुढील शेड्युल सोलापूर, कोल्हापूर, सातारामध्ये प्लॅन करण्यात आलेली आहे. या बायोपिकमध्ये श्रद्धा महाराष्ट्राच्या दिग्गज तमाशा कलाकार विठाबाईची भूमिका साकारत आहे, ज्यांना 1957 आणि 1990 मध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

हेही वाचा :
लाडक्या बहिणींचं सर्वात मोठं टेन्शन आता दूर, योजनेबाबत मोठी बातमी
संजय राऊतांच्या ट्वीटने राजकारणात खळबळ! शेवटी महाविकास आघाडीमध्ये…
IPL 2026 च्या लिलावात माजणार खळबळ! ‘या’ खेळाडूवर लागू शकते 30 कोटींची बोली