मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीला काहीच महिन्यांचा(politics) अवधी शिल्लक असताना राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. सत्ता हस्तगत करण्यासाठी महायुतीकडून आतापासूनच रणनीती आखली जात असतानाच महाविकास आघाडीमध्ये मात्र एकोपा पेक्षा मतभेदांची ठिणगी वाढताना दिसत आहे. मनसेसोबत आघाडी असल्यास आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह निवडणूक लढवणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने जाहीर केल्यानंतर राजकीय समीकरणे आणखी गुंतागुंतीची झाली आहेत.

या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने नवा राजकीय भूकंप घडवला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असले तरी राऊत यांनी स्पष्ट शब्दांत काँग्रेसच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे. “शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत आणि त्यासाठी कुणाच्या आदेशाची गरज नाही,” असा स्पष्ट संदेश देत त्यांनी मुंबईतील मतदारांची हीच इच्छा असल्याचेही नमूद केले.
याचबरोबर, त्यांनी काँग्रेसला अप्रत्यक्ष इशारा देत महाविकास आघाडी टिकवण्यासाठी सर्वांनी लवचिकता दाखवावी असे आवाहन केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (politics)यांनी मनसेसोबत जाण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.
या घडामोडींमुळे आता सर्वांचे लक्ष काँग्रेसच्या पुढील प्रतिक्रियेवर आहे. महाविकास आघाडी या निवडणुकीत एकसंध राहील की वेगवेगळ्या तंबूंतून लढत उतरेल? मुंबईच्या सत्तेच्या समीकरणात याचे मोठे परिणाम होणार हे निश्चित आहे. सरकार, सत्ता आणि समीकरणांच्या या खेळात आगामी काही दिवस अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत

हेही वाचा :
इंस्टाग्राम पोस्ट आणि रील्सवरील हॅशटॅग्सवर येणार मर्यादा, जाणून घ्या
तुम्हाला कळत नाही का? मी सांगतोय ना….,’ पोलिसांनी परवानगी नाकारताच अजित पवार संतापले…
अचानक पोलीस आणि डॉग स्क्वॉड पथक आलं, क्रिकेटर स्मृती मानधनाच्या लग्नाला काही तास बाकी असतानाच…