राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी सुरु केलेल्या ‘लाडकी बहीण(sisters)’ या महत्वाकांक्षी योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असलेल्या महिलांना दर महिन्याला ₹1500 सन्मान निधी देण्याची घोषणा विधानसभा निवडणुकीपूर्वी करण्यात आली होती. या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात महिलांना आर्थिक मदत मिळाली आणि या योजनेचा फायदाही महायुतीला निवडणुकीत झाल्याचं मानलं जात आहे.

योजनेत वाढ करून ₹2100 प्रति महिना देण्याचे आश्वासन काही नेत्यांनी प्रचारादरम्यान दिले होते. मात्र या वाढीसंदर्भात अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही.
अपात्र महिलांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू
योजना सुरू करताना काही अटी लागू करण्यात आल्या होत्या. मात्र अनेक अपात्र महिलांनी (sisters)देखील लाभ घेतल्याचे दिसून आल्यानंतर सरकारने आता काटेकोर तपासणी सुरु केली आहे. त्यामुळे अनेक महिलांची नावे योजनेतून हटवण्यात आली आहेत.
सरकारची आर्थिक जबाबदारी कमी करण्यासाठी आणि खऱ्या लाभार्थ्यांनाच फायदा मिळावा, यासाठी KYC प्रक्रिया सक्तीची करण्यात आली आहे. सुरुवातीची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर होती, मात्र आता ती वाढवून 31 डिसेंबर करण्यात आली आहे.
विरोधकांचे आरोप – सरकारी गोंधळ की योजना बंद?
महिलांची नावे वगळली जात असल्यामुळे विरोधकांनी योजनेवर प्रश्न उपस्थित केले असून, सरकार ही योजना बंद करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप ते करत आहेत. यामुळे अनेक लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे.
सरकारचा दिलासा – योजना बंद होत नाही
या सर्व चर्चांमध्ये आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
ते म्हणाले –
“लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. ही योजना सुरूच राहील.”
पालघर नगरपरिषद निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी हा खुलासा केला असून, त्यामुळे लाभार्थींमध्ये पुन्हा विश्वास निर्माण झाला आहे.

हेही वाचा :
संजय राऊतांच्या ट्वीटने राजकारणात खळबळ! शेवटी महाविकास आघाडीमध्ये…
IPL 2026 च्या लिलावात माजणार खळबळ! ‘या’ खेळाडूवर लागू शकते 30 कोटींची बोली
इंस्टाग्राम पोस्ट आणि रील्सवरील हॅशटॅग्सवर येणार मर्यादा, जाणून घ्या