पुणे विमानतळाच्या (airport)धावपट्टीलगत असलेल्या टॅक्सी वे के-४ परिसरात गुरुवारी रात्री सुमारे दीडच्या सुमारास पुन्हा बिबट्या आढळून आला. गेल्या दोन दिवसांत या भागात बिबट्याचे हे दुसरे दर्शन ठरले आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी विमानांची सर्वाधिक वाहतूक असतानाच बिबट्या पार्किंग बे क्रमांक ८, ९ आणि १० पासून काहीच अंतरावर दिसला. सुदैवाने तो थेट धावपट्टीवर पोहोचला नाही. या आठवड्यात मंगळवार आणि गुरुवारी मध्यरात्री बिबट्या धावपट्टीजवळील टॅक्सी वे-४ परिसरात दोनदा दिसल्याची नोंद आहे.

पहिल्यांदा त्याचे अस्तित्व हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले, तर गुरुवारी रात्री ग्राउंड स्टाफने बिबट्या पाहिल्याचे समजते. त्या वेळी धावपट्टी रिकामी असल्याने मोठा अनर्थ टळला. के-४ हा मार्ग टर्मिनलला जोडणाऱ्या समांतर टॅक्सीवेद्वारे महत्त्वाचा असल्याने ही घटना गंभीर मानली जात आहे यापूर्वीच्या घटनेनंतर वन विभागाने विमानतळ प्रशासनाला लोहगावच्या दिशेने असलेल्या संरक्षणभिंतीची डागडुजी तातडीने करण्याचे पत्र दिले होते. मात्र, अद्यापही भिंत दुरुस्तीअभावी तशीच असून, या भिंतीतूनच बिबट्या विमानतळ परिसरात येत असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. के-४ परिसरातील भुयारी ड्रेनेज पाइपला जाळ्या बसवून मार्ग बंद करण्यात आला आहे.

दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी लोहगाव परिसरात पिंजरे लावण्यात आले असून, कॅमेऱ्यांच्या माध्यमातून त्याच्या हालचालींवर सतत नजर ठेवली जात आहे. धावपट्टीखालील गटारांनाही जाळ्या लावून बंद करण्यात आले आहे. बिबट्याच्या वारंवार होत असलेल्या हालचालींमुळे सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली असून, विमान प्रवास सुरळीत ठेवण्यासाठी तातडीची पावले उचलण्याची गरज अधोरेखित होत आहे.धावपट्टीजवळ बिबट्याचा वावर असणे हे विमान व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर आहे. हवाई दल, विमानतळ(airport) प्रशासन आणि वन विभाग यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून बिबट्याला पकडावे.विमानतळाच्या आत व लोहगाव परिसरात दिसणारा बिबट्या हा एकच असून, दहा दिवसांनी तो पुन्हा विमानतळावर आला आहे. त्यावरून त्याचे क्षेत्र वाढत असल्याचा अंदाज आहे.

हेही वाचा :

लावणी करताना श्रद्धा कपूरला झाली दुखापत, शूटिंग थांबलं, सेटवर नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणींचं सर्वात मोठं टेन्शन आता दूर, योजनेबाबत मोठी बातमी

संजय राऊतांच्या ट्वीटने राजकारणात खळबळ! शेवटी महाविकास आघाडीमध्ये…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *