राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या (political)पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. प्रचाराची धामधूम सुरु असताना भाजपामध्ये जोरदार इनकमिंग होत असून त्याचा सर्वाधिक फटका हा महाविकास आघाडीपेक्षा महायुतीमधील दोन साथीदार — शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांना बसताना दिसत आहे. त्यामुळे महायुतीमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं असून शिवसेना शिंदे गट उघडपणे असंतोष व्यक्त करत आहे.

याच नाराजीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या काही मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कारदेखील घातला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
शिंदेंचा सूर बदलला; भाजपावर अप्रत्यक्ष टीका
डहाणू नगर परिषद निवडणुकीतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू माच्ची यांच्या प्रचारसभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच भाजपवर अप्रत्यक्ष टीका करत सूर बदलल्याचं चित्र दिसलं.
ते म्हणाले—
“एवढ्या मोठ्या संख्येनं कार्यकर्ते रस्त्यावर उतरले तर(political) समोरच्यांचे डिपॉझिट जप्त होणारच. ज्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले त्यांचं अभिनंदन. डहाणू नगर परिषद भगव्या ध्वजाखाली जाणार हे निश्चित.”
सभेत मोठी गर्दी पाहून शिंदे यांनी उमेदवार राजू माच्ची यांच्या विजयाचा दावा केला.
“एकाधिकारशाहीविरोधात एकत्र आलो आहोत”
भाजपचे नाव न घेता शिंदे म्हणाले—
“एकाधिकारशाही आणि अहंकाराविरोधात आम्ही आता एकत्र आलो आहोत.”
या विधानानंतर त्यांच्या भाषणाची राजकीय चर्चा अधिकच गडद झाली असून महायुतीतील मतभेद आता उघडपणे समोर येत असल्याचं संकेत मिळत आहेत.
सभेच्या शेवटी शिंदे यांनी मतदारांना आवाहन करत म्हटलं —
“राजू माच्ची यांच्या निशाणीवर शिक्का मारा आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा.”
या भाषणानंतर राज्याच्या सत्तेत असलेल्या महायुतीतील पुढील राजकीय समीकरणं कोणत्या दिशेला जातील, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :
लावणी करताना श्रद्धा कपूरला झाली दुखापत, शूटिंग थांबलं, सेटवर नेमकं काय घडलं?
लाडक्या बहिणींचं सर्वात मोठं टेन्शन आता दूर, योजनेबाबत मोठी बातमी
संजय राऊतांच्या ट्वीटने राजकारणात खळबळ! शेवटी महाविकास आघाडीमध्ये…