उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात घडलेल्या एका विचित्र घटनेने संपूर्ण परिसर दणाणून गेले आहे. लग्नाच्या आनंदात सर्व रंगून जात असतानाच अशी घटना घडली ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. सर्व विधी सुरळीत पार पडले पण निरोपाच्या क्षणीच नवरीच्या अचानक भरमंडपातून पळ काढला. या अनपेक्षित प्रसंगानंतर वर आणि (wedding)त्याचे कुटुंब पूर्णपणे खचून गेले. या घटनेमुळे लग्नाची वरात रिकाम्या हाताने घरी परतली आणि त्यातही आर्थिक नुकसान प्रचंड झाले. अशात आता लग्नाआधी वधूने केलेल्या नृत्याचा व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

वराचे नाव सुशील असून त्याच्या कुटुंबाने लग्नाचे सर्व खर्च भागवण्यासाठी तीन बीघा जमीन गहाण ठेवली होती. घरातील मोठ्या आशेने आणि प्रतिष्ठेने केलेली तयारी एका क्षणात धुळीस मिळाली. नवरी मिळाली नाहीच, पण गहाण ठेवलेली जमीनही परत मिळण्याची खात्री उरली नाही. कुटुंबीयांच्या मते, या लग्नासाठी(wedding) त्यांनी लाखो रुपये खर्च केले होते.घटना उघड झाल्यानंतर सोशल मीडियावर वर-वधूच्या विवाहसोहळ्यातील व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की सुंदर सजावटीमधील विवाहस्थळी डीजेच्या तालावर वधू मनसोक्त नाचत आहे. वधूने लाल लेहंगा घातला असून वराच्या खांद्यावर हात ठेवून आनंदात ती व्हिडिओत ठुमके मारताना दिसते.
DJ पर दूल्हे संग डांस कर रही ये दुल्हन विदाई से ठीक पहले गायब हो गई। जयमाला हुई, 7 फेरे हुए। मांग में सिंदूर भरा गया। विदाई की बारी आई तो दुल्हन लापता थी। बिना दुल्हन बारात वापस लौट गई। दूल्हे सुशील ने 3 बीघा जमीन गिरवीं रखकर शादी की तैयारियां की थी।
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) November 20, 2025
📍जिला बाराबंकी, यूपी pic.twitter.com/VJlNPJgjXP
आजूबाजूच्या पाहुण्यांचा उत्साह आणि टाळ्यांचा आवाज वातावरणाला अधिक साज चढवत होता. या आधी लग्नाचे सर्व विधी पार पडले होते. संपूर्ण समारंभात कुठेही काही बिनसलं असल्याचे कोणालाच जाणवलं नव्हतं. प्रत्येकाला वाटत होते की हा लग्नसोहळा सुखरूप पूर्ण झाला आहे. मात्र निरोपाची वेळ(wedding) जवळ येताच परिस्थिती अचानक बदलली. कुटुंबीयांनी सांगितले की वधू अचानक दिसेनाशी झाली. सुरुवातीला तिला कोठे तरी गेली असेल असे वाटले, पण बराच वेळ झाल्यावरही तिचा पत्ता लागलाच नाही. अनेक तासांच्या शोधानंतरही वधू सापडली नाही.
वराच्या वडिलांनी सांगितले की या घटनेमुळे केवळ आर्थिक परिस्थिती बिघडली नाही, तर समाजातही मोठे अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. गावात या घटनेची मोठी चर्चा असून कुटुंबावर मानसिक ताण वाढला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ केस नोंदवली आणि वधूच्या शोधासाठी पथक तयार केले आहे. घटनेमागील कारण नेमके काय आहे, दुल्हन स्वतःहून गेली की तिला कोणी जबरदस्तीने पळवून नेले, याचा तपास सुरू आहे. याचा व्हिडिओ @SachinGuptaUP नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा :
मध्यरात्रीची वेळ अन् एअरपोर्ट रन-वे जवळ बिबट्याचे दर्शन…
महायुतीमध्ये संघर्षाला सुरुवात, पहिल्यांदाच एकनाथ शिंदे भाजपवर कडाडले
लावणी करताना श्रद्धा कपूरला झाली दुखापत, शूटिंग थांबलं, सेटवर नेमकं काय घडलं?