स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकीय(political) पटावर विचित्र आणि अनपेक्षित संगम आकाराला येत आहेत. राज्य आणि केंद्रात महायुती व महाविकास आघाडी अशा मोठ्या आघाड्या अस्तित्वात असल्या तरी स्थानिक पातळीवर परिस्थिती पूर्णपणे उलट दिसते. वैचारिक भूमिकेपेक्षा “गरज” आणि “गणित” अधिक महत्वाचं ठरत असल्याचं या निवडणुकीत स्पष्ट होतंय.

चोपडा नगर परिषद निवडणुकीत तर राजकीय समीकरणांनी मतदारांना अक्षरशः चक्रावून टाकलं आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसने शिवसेना शिंदे गटासोबत युती केली असून या निर्णयामुळे आघाडीत भला मोठा विसंवाद निर्माण झाला आहे. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला या निवडणुकीत एकहाती लढण्याची वेळ आली आहे.

या अनपेक्षित युतीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. चंद्रकांत बारेला यांनी जोरदार टीका केली आहे.

“सत्तेचा वाटा मिळावा म्हणून काँग्रेस सोयीची युती करत आहे. जनता मूर्ख नाही. अशा अभद्र युतींना आता लोक कंटाळले आहेत,” अशी टीका त्यांनी केली.

तसेच,
“आज परिस्थिती पैशांच्या मोहाने बदलली असेल, पण अशा युती फार काळ टिकणार नाहीत,” असा दावा त्यांनी व्यक्त केला.

या राजकीय उलथापालथीत काँग्रेस-शिंदे गट एकत्र, शिवसेना(political) ठाकरे गट स्वबळावर, तर राष्ट्रवादी शरद पवार गट फक्त दोन जागांवर लढत असल्याने महाविकास आघाडीचीच प्रतिमा धोक्यात आली आहे.

मतदारांची प्रतिक्रिया कुठे?

स्थानिक पातळीवर मतदारांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे —
“इतके दिवस आमचा मतविचार वेगळा, आता उमेदवार एकत्र? मग विश्वास कुणावर ठेवायचा?”

2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल होत असल्याने पुढील काही दिवसांत चोपड्यातील हे राजकीय प्रयोग मतपेट्यांमध्ये कसे उमटतात याकडे राज्याचे लक्ष लागून राहणार आहे.

हेही वाचा :

लग्नात मनसोक्त नाचली अन् संधी भेटताच वराला सोडून भरमंडपातून गायब झाली नवरी; Video Viral

ICC ने ‘या’ क्रिकेटरला अचानक केलं सस्पेंड, कोणत्या गोष्टीसाठी मिळाली शिक्षा

मध्यरात्रीची वेळ अन् एअरपोर्ट रन-वे जवळ बिबट्याचे दर्शन…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *