भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल यांच्या लग्नसोहळ्यापूर्वी दोन्ही कुटुंबांसमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी सांगलीत त्यांचा विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र या खास प्रसंगी आधी स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांची अचानक प्रकृती(health) बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेनंतर आता पलाश मुच्छलचीही प्रकृती ढासळल्याची माहिती समोर येत आहे.

स्मृती मानधनाच्या वडिलांना गाठलेल्या या प्रकृती समस्येमुळे संपूर्ण कुटुंबाने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. आता पलाशलाही उपचार घ्यावे लागल्याने लग्नसोहळ्याशी संबंधित सर्व कार्यक्रम थांबवण्यात आले आहेत. अचानक आजारी पडल्याने लग्नाच्या तयारीवरही परिणाम झाला असून चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण आहे.स्मृती मानधनाचे वडील रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही तासातच पलाश मुच्छलची तब्येतही(health) बिघडली. मिळालेल्या माहितीनुसार त्याला व्हायरल इन्फेक्शन आणि पित्ताचा त्रास झाल्याने त्याला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले.

उपचारानंतर त्याला बाहेर सोडण्यात आलं असून तो सध्या हॉटेलमध्ये विश्रांती घेत आहे. डॉक्टरांनी काही दिवस काळजी घेण्याचा सल्ला देत औषधोपचार सुरू ठेवण्याची सूचना केली आहे.या घटनांनंतर आता रविवारी होणारा स्मृती आणि पलाशचा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. या संदर्भात मानधना कुटुंबातील जवळचे नातेवाईक तोहीन मिश्रा यांनी अधिकृत माहिती दिली आहे.

त्यांनी सांगितले, “जोपर्यंत श्रीनिवास मानधनांची तब्येत पूर्णपणे स्थिर होत नाही, तोपर्यंत लग्नाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.” दोन्ही कुटुंबांनी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन हा निर्णय एकमताने घेतला.या अचानक झालेल्या घटनांमुळे सांगलीत जमलेल्या पाहुण्यांनाही परत जावे लागले आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील काही खेळाडू गेल्या दोन दिवसांपासून सांगलीत उपस्थित होते.

हेही वाचा :

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, हवामानात मोठा बदल

कोल्हापुरात विवाहितेच्या आत्महत्येनं खळबळ! सासऱ्यानं निवडणुकीसाठी… माहेरच्यांचे गंभीर आरोप

स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *