भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि सुप्रसिद्ध गायक पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर (wedding)आली आहे. लग्नाच्या पूर्वसंध्येला स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. या अनपेक्षित परिस्थितीमुळे कुटुंबाने लग्नाचा सगळा कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

घटनेनंतर स्मृतीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हळदी, मेहंदी आणि इतर प्री-वेडिंग फंक्शनचे फोटो आणि व्हिडिओ काढून टाकले आहेत. तर दुसऱ्याच दिवशी पलाश मुच्छल यालाही प्रकृती बिघडल्याने सांगलीतील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मुंबईत हलविण्यात आले असून ते आता घरी विश्रांती घेत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
पलाशची बहीण आणि गायिका पलक मुच्छल हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दोन्ही कुटुंबांना या प्रसंगी गोपनीयता देण्याची विनंती केली आहे. स्मृती आणि पलाशच्या लग्नाची आतुरता बाळगणाऱ्या चाहत्यांनी सोशल मीडियावरून सहानुभूती व्यक्त करत दोघे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, रविवारी एका खासगी समारंभात होणाऱ्या या विवाह(wedding) सोहळ्याला भारतीय महिला क्रिकेट संघातील जेमिमा रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, रिचा घोष आणि इतर अनेक खेळाडू उपस्थित राहणार होत्या. स्मृतीच्या हळदी समारंभातील नृत्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
या अनपेक्षित परिस्थितीनंतर आता दोन्ही कुटुंबांकडून लग्नाच्या नव्या तारखेची घोषणा केव्हा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :
60 वर्षाची गर्लफ्रेंड 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडकडे एकच मागणी करत होती…
पॅन आणि बँक खाते लिंक कसे करावे? ऑनलाईन प्रोसेस जाणून घ्या
कर्जदारांसाठी आनंदाची बातमी! तुमच्या कर्जाचा EMI कमी होणार?