लोकप्रिय नेव्हिगेशन अॅप असलेल्या गुगल मॅप्समध्ये (features)आता पुन्हा एकदा काही नवीन अपडेट्सचा समावेश करण्यात आला आहे. हे नवीन अपडेट्स यूजर्ससाठी अतिशय फायदेशीर ठरणार असून या नवीन अपडेट्समुळे यूजर्सचा अनुभव वाढणार आहे, यात काही शंकाच नाही. यूजर्सना ट्रिप आणि डेली ट्रॅवलिंग अधिक सोपी व्हावी, यासाठी गुगल मॅप्समध्ये नवीन अपडेट्सचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीने अलीकडेच रोलआऊट करणयात आलेल्या काही फीचर्ससाठी नवीन अपडेट्स जारी केले आहेत. या नवीन अपडेट्समध्ये Gemini इंटीग्रेशन, इंप्रूव ईवी चार्जर लोकेटर, रिफ्रेश एक्सप्लोरर टॅब, लोकल बिजनेससाठी नवीन रिव्यू ऑप्शन समाविष्ट आहे. यामधील काही अपडेट्स सर्व यूजर्ससाठी रिलीज करण्यात आहेत. तर कंपनीने काही अपडेट्स निवडक देशांमधील यूजर्ससाठी रिलीज केले आहेत.

गुगल मॅप्समध्ये आता यूजर्स रेस्टोरेंट्स, होटेल्स, वेन्यू आणि दूसऱ्या लोकेशनबाबत Gemini द्वारे रिसर्च करू शकणार आहेत. हे टूल यूजर्सना एखाद्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी त्या संबंधित(features) ठिकाणाचे रिव्ह्यु आणि उपलब्ध असलेली माहिती शेअर करतो. यूजर्स या अपडेटच्या मदतीने पार्किंग, मेन्यू आणि दूसरी महत्त्वाची माहिती मिळवू शकणार आहेत. हे नवीन अपडेट अँड्रॉईड आणि आईओएस यूजर्ससाठी अमेरिकेत लाँच करण्यात आले आहे.
गुगल मॅप्सचे Explorer टॅब आता तुमच्या आजूबाजूच्या जागा आणि अॅक्टिव्हिटी हायलाइट करणार आहे. यासाठी यूजर्सना ट्रेंडिंग स्पॉट्स, रेस्टोरेंट्स आणि आजूबाजूच्या प्रसिद्ध जागा पाहण्यासाठी स्वाइप अप करावं लागणर आहे. यासोबतच या टॅबमध्ये लोन्ली प्लॅनेट, ओपन टेबल, व्हायटर आणि लोकल क्रिएटर्सच्या रिकमेंडेशन देखील पाहायला मिळणार आहेत. गूगलने हे फीचर आईओएस आणि अँड्रॉईडवर ग्लोबली लाँच केले आहे.
गुगल मॅप्समध्ये EV चार्जिंग लोकेटर 2022 मध्ये समाविष्ट करण्यात आले होते. आता यामध्ये काही बदल करण्यात आले असून हे फीचर अपडेट करण्यात आले आहे. आता, जेव्हा यूजर्स मॅप्समध्ये ईव्ही चार्जर शोधतील, तेव्हा त्यांना त्या ठिकाणी पोहोचल्यावर किती चार्जर दृश्यमान आहेत याचा डेटा देखील मॅपमध्ये पाहायला मिळणार आहे. ही सिस्टम AI सोबत काम करेल. गुगल लवकरच अँड्रॉइड ऑटो आणि गुगल बिल्ट-इन कारसाठी जागतिक स्तरावर हे वैशिष्ट्य लाँच करणार आहे.
Google ने हॉलिडे-सीजनमध्ये रिव्ह्यु शेअर करणाऱ्या यूजर्ससाठी नवीन थीम वाले रिव्यू प्रोफाइल जोडले आहे. रिव्यू करताना यूजर्स आपलं नाव आणि फोटो बदलू शकणार आहेत. हे अपडेट लवकरच ग्लोबली रिलीज केलं जाणार आहे.

हेही वाचा :
महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, हवामानात मोठा बदल
कोल्हापुरात विवाहितेच्या आत्महत्येनं खळबळ! सासऱ्यानं निवडणुकीसाठी… माहेरच्यांचे गंभीर आरोप
स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका…