WhatsApp ने एक नवीन फीचर (feature)रोलआउट केलं आहे. हे नवीन फीचर इंस्टाग्राम नोट्सप्रमाणेच आहे. खरं तर हे फीचर WhatsApp च्या जुन्या About स्टेटसला अपडेट करून नवीन फीचर रोलआऊट करण्यात आलं आहे. तुम्ही या फीचरमध्ये एक छोटा टेक्स्ट अपडेट किंवा इमोजी शेयर करू शकता आणि शॉर्ट टेक्स्ट अपडेटद्वारे लोकांना तुमच्या आजच्या दिवसाबद्दल, मूड किंवा इतर अपडेटबाबत माहिती शेअर करू शकता. हे अपडेट आता वन-टू-वन चॅट्सच्या वरील बाजूला आणि तुमच्या प्रोफाईलवर पाहायला मिळणार आहे. तसेच तुमचे कॉन्टॅक्ट्स अबाऊट स्टेटसवर टॅप करून तुम्हाला रिप्लाय करू शकणार आहेत, ज्यामुशे चॅट सुरु करता येणार आहे.

डिफॉल्ट रूपाने हे अपडेट 24 तासांसाठी उपलब्ध असणार आहे, नंतर हे अपडेट गायब होणार आहे. जसे इंस्टाग्राम नोट्समध्ये होते. WhatsApp च्या या अपडेटमध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार टाइमर कमी जास्त करू शकणार आहात. यामध्ये यूजर्सना प्रायव्हसी कंट्रोलचा पूर्ण अधिकार मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला अबाऊट स्टेटस कोणासोबत शेअर करायचा आहे आणि कोणासोबत नाही हे तुम्ही ठरवू शकणार आहात. फक्त तुमचे संपर्क किंवा तुम्ही तुमच्या प्रायव्हसी सेटिंग्जद्वारे ते मर्यादित करू शकता. हे फीचर अशा लोकांसाठी खास असणार आहे, ज्यांना WhatsApp Status (फोटो/व्हिडीओ वाली स्टोरी) ऐवजी एक सोपं आणि टेक्स्ट-आधारित अपडेट देणं आवडतं.

WhatsApp ओपन करा. अँड्रॉइडमध्ये वरील उजव्या बाूजला दिसणाऱ्या तीन डॉट्सवर टॅप करा आणि सेटिंग्स निवडा.iPhone मध्ये खालील उजव्या बाूजला दिसणारी सेटिंग्स (feature)निवडा.आता तुमच्या प्राफाईलवर टॅप करा आणि सेटिंग्स मेनूमध्ये वरच्या बाजूला तुमचे नाव आणि प्रोफाइल फोटो वर टॅप करा. आता तुमची प्रोफाईल माहिती ओपन होईल.About सेक्शनवर जा आणि तुमच्या प्रोफाइल स्क्रीनवर “About” च्या बाजूला तुम्हाला तुमचे करंट अपडेट दिसेल.

About वर टॅप करा आणि प्री- सेट ऑप्शन्समधून कोणतेही एक निवडू शकता. जसे, अ‍ॅव्हेलेबल, बिझी, अ‍ॅट स्कुल, अ‍ॅट द मूव्हीज आणि तुमच्यासारखे इतर लोक ‘Currently set to’ किंवा अशाच काही खाली असलेल्या पेन्सिल आयकॉनवर टॅप करून तुमचे कस्टम वर्णन टाइप करू शकतात आणि ते सेव्ह करू शकतात.कस्टम वर्णन टाइप केल्यानंतर सेव्ह बटनवर टॅप करा.आता जेव्हा जेव्हा कोणी तुमचा WhatsApp प्रोफाइल बघेल तेव्हा त्यांना तुमच्या प्रोफाइल फोटो आणि नावाखाली तुमचे नवीन About डिटेल्स दिसतील.अशा पद्धतीने तुम्ही About फीचरचा वापर करून तुमचे डेली अपडेट इतर यूजर्ससोबत शेअर करू शकता.

हेही वाचा :

“धर्मेंद्रजींच्या निधनाने एका युगाचा…”; PM नरेंद्र मोदींंनी वाहिली श्रद्धांजली

विवाहित महिलेचे दोन प्रियकर… तिसऱ्या तरुणाची एन्ट्री अन्…

“बाबा वेंगांनी सांगितलंय: 2026 हे वर्ष बदलणार तुमची दुनिया!”

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *