उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. आपल्या 60 वर्षीय गर्लफ्रेंडची (girlfriend)हत्या करणाऱ्या आरोपी इमरानला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 14 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली होती, जेव्हा रस्त्याच्या कडेला एका अज्नात महिलेचा मृतदेह आढळला होता. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी 10 विशेष पथके तयार केली आणि सुमारे 1,000 सीसीटीव्ही फुटेजची छाननी करण्यात आली. त्यानंतर मृत महिलेची ओळख जोशीना (वय 60) अशी पटली आणि तपासाचा दिशा आरोपीकडे वळला.

तपासादरम्यान उघड झालेल्या माहितीनुसार, इमरान (45) आणि जोशीना यांचे प्रेमसंबंध(girlfriend) होते. इमरानचे सासर पश्चिम बंगालमध्ये जोशीनाच्या घराजवळ असल्यामुळे दोघांची ओळख वाढली आणि नंतर ते प्रेमात पडले. दरम्यान, जोशीनाच्या मुलगी मुमताजचे लग्न 10 नोव्हेंबर रोजी झाले, त्यासाठी ती कोलकात्यातून आगऱ्यामध्ये आली होती.

याच काळात जोशीना इमरानवर दुसरे लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती, परंतु इमरान आधीच विवाहित आणि दोन मुलांचा बाप असल्याने तो ही नाती कायम ठेवू इच्छित नव्हता. चौकशीत इमरानने कबूल केले की, 13 नोव्हेंबर रोजी त्याने कोलकात्याला घेऊन जाण्याचे आश्वासन देऊन जोशीनाला सोबत घेतले. मात्र, पश्चिम बंगालकडे जाणारी बस न पकडता तो आगरा-हाथरस मार्गावर उतरला.

दोघे हाथरसच्या नगला भुस परिसरात बसमधून उतरल्यानंतर निर्जन ठिकाणी नेऊन इमरानने जोशीनाची गळा आवळून हत्या केली आणि तिथून पसार झाला.शेवटी तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी इमरानला हाथरसजवळील हतीसा पुल परिसरातून अटक केली. आरोपीविरुद्ध आता हत्या आणि पुरावे लपवण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.ही घटना प्रेमसंबंधातून जन्मलेल्या गुन्ह्याचे गंभीर उदाहरण ठरत आहे.

हेही वाचा :

खूप जुनी इच्छा पूर्ण होणार, आजचा दिवस अविस्मरणीय जाणार.. वाचा आजचं भविष्य

WhatsApp चे नवीन ‘About’ फीचर रोलआउट, यूजर्स शेअर करू शकतात रोजचे अपडेट्स

हातपाय सतत थंड पडत असतील तर, ‘हे’ घरगुती उपाय नक्की करुन बघा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *