कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:
उद्याची सुजान पिढी घडवण्याची जबाबदारीमुख्यतः शिक्षकांवर(teachers) येते.तथापि या जबाबदारी शिवाय त्याच्यावर शासनाने आणखी काही जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. त्यातून वेळात वेळ काढून त्याला ज्ञान दानाचे काम करावे लागते. हे काम करण्याची त्याची पात्रता आहे काय? हे तपासून पाहण्यासाठी त्याला “पात्रता” परीक्षेला बसावे लागते आणि उत्तीर्णही व्हावे लागते. त्यासाठी इतर शिक्षकांना शॉर्टकट देण्याच्या तयारीत असणाऱ्या पाच शिक्षकांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या एका पथकाने दोन दिवसापूर्वी अटक केली. शॉर्टकटचा पर्याय शोधणाऱ्या या शिक्षकांची यत्ता कंची?असा प्रश्न पालकांना आणि विद्यार्थ्यांनाही पडला आहे.जे शिक्षक म्हणून विविध शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये काम करतात. त्यासाठी शासकीय पगार घेतात. त्यांनीशिक्षक म्हणून काम करण्यास आपण पात्र आहोत का? यासाठीची “टीईटी”परीक्षा त्यांच्यासाठी अनिवार्य केलेली आहे.

आता तर ज्यांनी ही परीक्षा दिलेली नाही त्यांची नोकरी धोक्यात येईल असा इशारा शिक्षण विभागाने दिल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली नाही तरच नवल. शिक्षक(teachers) संघटनांनी याबद्दल आवाजही उठवला होता. पण टीईटी परीक्षा दिलीच पाहिजे, तडजोड नाही असे शासनाने स्पष्ट केल्यानंतर अशा प्रकारची पात्रता परीक्षा देण्याशिवाय अन्य मार्गच उरला नाही.ही पात्रता परीक्षा कठीण आहे असे एकूण दिसते. त्यामुळे या परीक्षेचा पेपर फोडला तर सर्वांचेच कल्याण होईल म्हणून काही शिक्षकच त्यासाठी पूर्वतयारीला लागले होते. पण त्यांचा हा फोडाफोडीचा पेपर फुटला.तो पोलिसांच्या हाती लागला.आणि मग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कागल तालुक्यातील सोनगे गावात धाड टाकून नऊ जणांना अटक केली. त्यात पाच शिक्षक आहेत. प्रिंटर, मोबाईलचे 9 हँडसेट, शैक्षणिक कागदपत्रे, सही असलेले कोरे धनादेश आणि परीक्षार्थी उमेदवारांच्या नावांची यादी, आणि रजिस्टर असे साहित्य या धाडीत सापडले.
टीईटी परीक्षेचा पेपर फोडायचा, यादीत असलेल्या परीक्षार्थी उमेदवारांच्या पर्यंत तो पोहोचवायचा असे या मंडळींनी ठरवले होते. पण त्यांच्या या कारस्थानाचा सुगावा पोलिसांना लागला आणि पाच शिक्षकांसह काहीजण पोलिसांच्या ताब्यात आले.इयत्ता दहावी, इयत्ता बारावी तसेच महाविद्यालयीनपरीक्षांचे पेपर फुटले जातात..यापूर्वी असे अनेकदा घडलेले आहे. विशेष म्हणजे शिक्षण विभागातील उच्च पदस्थ अधिकारीही पेपर फुटी प्रकरणात यापूर्वी सापडले आहेत. तीन वर्षापूर्वी टीईटी परीक्षेचा पेपर फुटला होता.तत्कालीन एका मंत्र्याचीशिक्षक असलेली कन्या अडचणीत आली होती.तुम्ही शिक्षक म्हणून काम करण्यास पात्र आहात का? हे तपासून पाहण्याचा अधिकार शासनाला आहे.पण अशा प्रकारची अट पूर्वी नव्हती. म्हणजे पूर्वी सर्व शिक्षक हे विद्यार्थ्यांना योग्य ते शिक्षण देण्यास पात्र होते असा होतो. पण आत्ताच या शिक्षका विषयी शासनाला का संशय येतो हेसमजण्यास मार्ग नाही.शिक्षकाला त्याचे ज्ञानदानाचे मुख्य काम शासन व्यवस्थेकडून करू दिले जात नाही. मतदार याद्या तयार करणे, मतदान प्रक्रियेत भाग घेणे, जनगणना करणे, शासकीय पातळीवरची इतर सर्वेक्षणे करणे, अशी वेगवेगळी कामे या शिक्षकाकडून करवून घेतली जातात.
अन्य कामात जास्त वेळ जात असल्यामुळे शाळेमध्ये पूर्ण क्षमतेने शिकवण्याचे काम करणेत्याच्याकडून होताना दिसत नाही. त्याचा परिणाम शिक्षणाच्या दर्जावर नक्कीच झालेला आहे. पण त्याचा विचार न करता त्याच्याकडून पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अपेक्षित करण्यात आले आहे.शिक्षकांनी पूर्ण क्षमतेने आपले काम केले पाहिजे. जबाबदार पिढी घडवण्याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे किंवा त्याची ती जबाबदारी आहेच. पण त्यासाठी त्याला इतर कामातून मुक्त करणे गरजेचे असतेआणिआहे.टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे ही शिक्षकांच्यासाठी अट असेल तर ती त्यांनी पूर्ण केलीच पाहिजे. त्यासाठी स्वतः अभ्यास केलापाहिजे.शिक्षक म्हणून काम करण्यास आपण पात्र आहोत हे त्यांनी सिद्ध करून दाखवले पाहिजे.पण त्यासाठी गुन्हेगारी मार्ग स्वीकारणे हे अक्षम्य आहे. शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपरफोडण्याचा आणि बहुतांशी शिक्षकांच्या पर्यंत तो पोचवण्याचा, त्यांना त्यात उत्तीर्ण करण्याचा काही शिक्षकांनीच प्रयत्न करावा यासारखे दुर्दैव कुठले नाही.
पोलीस तपासात आता बऱ्याच गोष्टी पुढे येतील. जे परीक्षार्थी होते आणि ज्यांची नावे या टोळीकडे होती, त्या सर्वांची आता चौकशी होईल.संबंधित शिक्षकांच्या कडून किती पैसे घेतले जाणार होते हे सुद्धा आता समोर येईल.पेपर फोडण्याच्या प्रयत्नात असणारे शिक्षकच आणि त्याचे लाभार्थी शिक्षकच असे पहिल्यांदा घडले आहे. तीन लाख रुपयांना पेपरची एक झेरॉक्स विकली जाणार होती. या परीक्षेचा ज्यांनी पेपर तयार केला आहे ते यात सहभागी आहेत का? किंवा एकूण प्रक्रियेत असलेले कोणी अन्य या गुन्ह्यात सहभागी आहे का हे सुद्धा आता पोलीस तपासात स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा :
60 वर्षाची गर्लफ्रेंड 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडकडे एकच मागणी करत होती…
पॅन आणि बँक खाते लिंक कसे करावे? ऑनलाईन प्रोसेस जाणून घ्या
कर्जदारांसाठी आनंदाची बातमी! तुमच्या कर्जाचा EMI कमी होणार?