कोल्हापूरतर्फे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, जिथे अवैध गर्भलिंग निदान केंद्राविरुद्ध मोठी कारवाई (illegal)करण्यात आली आहे. करवीर तालुक्यातील बालिंगा परिसरात एका केंद्रात बेकायदेशीर गर्भलिंग निदान सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच, कोल्हापूर पोलीस आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने संयुक्त छापा टाकला. पोलिसांच्या या कारवाईनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

छाप्यात पोलिसांनी गर्भलिंग(illegal) निदानासाठी वापरली जाणारी मशीन, संबंधित औषधे आणि गोळ्या जप्त केल्या आहेत. यावेळी पोलीस आणि आरोग्य अधिकाऱ्यांकडून बालिंगा परिसरात पंचनामा करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
सध्या या अवैध रॅकेटशी संबंधित संशयित डॉक्टर फरार असून, पोलिसांच्या तपासात प्रकरणातील एजंटची नावे देखील समोर आली आहेत. कोल्हापूर पोलीस या प्रकरणात पुढील कठोर कारवाईसाठी सज्ज आहेत आणि संबंधितांवर त्वरित योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा :
‘त्याच्या जाण्याने…’, रात्रभर वीरूच्या आठवणीत जय अस्वस्थ! 2.25 AM ला अमिताभ म्हणाले
स्मृती मानधनाने घेतली वडिलांची भेट…
इचलकरंजीत मतदार यादीत घोळ! एका गल्लीतील सर्व मतदार दुसऱ्या प्रभागात