भारतीय महिला क्रिकेट (cricket)संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि दिग्दर्शक पलाश मुच्छल यांचा विवाह आता पुढे ढकलण्यात आला आहे. स्मृतीचे वडील, श्रीनिवास मानधना यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सोमवारी स्मृती(cricket) आणि तिच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात जाऊन त्यांची प्रकृतीची विचारपूस केली. रुग्णालयाकडून श्रीनिवास मानधनांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले असले तरी, स्मृतीने वडिलांची तब्येत सुधारल्याशिवाय लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, पलाश मुच्छल आणि त्यांचे नातेवाईक मुंबई व इंदूरला रवाना झाले असून, लग्नासाठी सांगलीत आलेले इतर पाहुणे देखील रविवारीच परतले. या लग्नाची मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली होती, मात्र अचानक आलेल्या या वैद्यकीय परिस्थितीमुळे समारंभ अनिश्चित काळासाठी पुढे ढकलावा लागला.
स्मृतीसोबत महिला क्रिकेटपटू(cricket)श्रेयांका पाटील, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव, अरुंधती रेड्डी आणि शेफाली वर्मा सांगलीत उपस्थित होत्या. स्मृतीच्या लग्नाचा पुढील तारखेचा निर्णय कुटुंबाच्या परवानगीने नंतर घेतला जाईल.

हेही वाचा :
इचलकरंजीत मतदार यादीत घोळ! एका गल्लीतील सर्व मतदार दुसऱ्या प्रभागात
मास्तर! तुमची यत्ता कंची?
तुमची पर्सनल माहिती कळणार नाही, नव्या आधार अॅपचे ‘हे’ फीचर वापरा