भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न रविवारी रंगणार होते, पण अचानक परिस्थिती(health) बदलल्यामुळे हा कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.

लग्नाच्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची प्रकृती (health)अचानक बिघडली. सुरुवातीला हा त्रास हलका वाटला, पण काही मिनिटांतच परिस्थिती गंभीर बनली. तातडीने त्यांना सांगलीतील सर्वहित हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. स्मृतीचे व्यवस्थापक तुहिन मिश्रा यांनी ही माहिती दिली.
त्याचवेळी, नवरा पलाश मुच्छल यालाही पित्ताचा त्रास वाढल्याने तब्येत बिघडली, मात्र त्याला उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि त्याने मुंबईकडे प्रस्थान केले. हॉस्पिटल प्रशासनानुसार, दोघांची तब्येत आता स्थिर असून कोणताही धोका नाही. दोन दिवसांच्या उपचारानंतर श्रीनिवास मानधना यांना डिस्चार्ज देण्यात आला असून ते घरी परतणार आहेत.
यावेळी स्मृतीने तिच्या लग्नसंबंधित पोस्ट डिलीट केल्या होत्या, ज्यामुळे चर्चा रंगल्या होत्या. पलाश मुच्छल यांची बहिण पलक मुच्छल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले की, “स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडली आणि त्यामुळे लग्न थांबवण्यात आले आहे. कृपया या क्षणी दोन्ही कुटुंबियांच्या प्रायव्हसीचा आदर करा.”स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या चाहत्यांची नजर आता दोघांच्या लग्नाबाबत येणाऱ्या अधिकृत अपडेटवर आहे.

हेही वाचा :
कोल्हापुरात अवैध गर्भलिंग निदान सेंटरवर छापा…
‘आम्ही भारताला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त…’, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरावर ध्वजारोहण
अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीने उडवले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू