वार्ता- दि- 19 व 20 नोव्हेंबर 2025 दरम्यान झालेल्या श्री शहाजी छत्रपती महाविदयालय,कोल्हापूर आयोजीत शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय बॉक्सिंग (boxing)पुरुष / महिला स्पर्धेत डी. के. ए. एस. सी. च्या बॉक्सरनी उत्कृष्ट कामगीरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये कुमारी साक्षी जाधव हीने 57 किलो वजनी गटात एकून चार बाऊट खेळून सुवर्ण पदकावर शिक्का मोर्तब केला.

तसेच प्रेम लोंडे याने 60 किलो वजनी गटात एकून तीन बाऊट खेळून (boxing)सुवर्ण पदक पटकावले तर प्रणव पेटकर याने 50 kg वजनी गटात एकूण चार बाऊट खेळून सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. या तीनही खेळाडुंची निवड कुरुक्षेत्र युनिव्हर्सिटी, हरयाना येथे होणाऱ्या ऑल इंडिया इन्टर युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी त्याची शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली आहे. तसेच या स्पर्धत 85 किलो वजनी गटात रामानून सिंग याने रजत पदक व 90 किलो वजनी गटात विवेकानंद चौगुले याने कास्य पदक पटकावले आहे.
या सर्व खेळाडूंचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के. खाडे यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महाविद्यालयाचे अधिक्षक श्री प्रकाश कुराडे उपस्थित होते. शारीरिक शिक्षण संचालक प्रा. मुजफ्फर लगीवाले व प्रा. विनायक भोई यांचे मार्गदर्शन तर श्री स्वप्नील सुर्यवंशी याचे सहकार्य लाभले.

हेही वाचा :
शिंदे सेनेकडून एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी…
एका तासाचे किती घेशील?, नॅशनल क्रश अभिनेत्रीला अश्लील मेसेज
महिलेकडून पुरुषावर लैंगिक अत्याचार, गुंगीचं औषध दिलं अन् नंतर….