संगीतकार पलाश मुच्छल आणि क्रिकेटपटू स्मृती मानधना(involving) यांच्या विवाहाचा विषय मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. सांगलीत 23 नोव्हेंबरला दोघांचे लग्न होणार होते. हळद, मेहंदी, संगीत समारंभापर्यंत सर्व कार्यक्रम पार पडले होते. मात्र अचानक लग्न पुढे ढकलण्यात आले, स्मृतीचे वडील आजारी असल्याने तातडीने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. पण त्यानंतर लगेचच पलाशने स्मृतीला फसवल्याच्या अफवा पसरू लागल्या आणि इंटरनेटवर खळबळ उडाली.याचदरम्यान, मेरी डि’कोस्टा नावाच्या एका महिलेने पलाशसोबतचे चॅट स्क्रीनशॉट शेअर करत त्याच्यावर गंभीर आरोप केले. या स्क्रीनशॉटमध्ये पलाश तिच्यासोबत फ्लर्ट करताना आणि भेटण्याची मागणी करताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला. या उघडकीनंतर प्रकरण आणखी चिघळले. आता या वादळात एका नवीन महिलेचं नावही समोर आलं असून सोशल मीडियावर तिची चर्चा रंगत आहे.

स्मृती आणि पलाशच्या संगीत समारंभाचे नृत्यदिग्दर्शन प्रसिद्ध कोरिओग्राफर बॉस्को-सीझर यांच्या टीमने केले होते. त्यातील मेंबर गुलनाज खान हिचं नाव यामध्ये समोर आलं आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्स पलाश आणि गुलनाजचे फोटो व्हायरल करत दोघांमधील कथित जवळीकबद्दल चर्चा करत आहेत.(involving) एका रेडिट पोस्टमध्ये तर सरळ आरोप करण्यात आला की,“पलाशने गुलनाज खानमुळे स्मृतीची फसवणूक केली.” एवढंच नाही, स्तुती नावाच्या एका युजरनेही अशाच प्रकारचा दावा करत पोस्ट शेअर केली होती.या युजरच्या दाव्यानुसार, संगीत समारंभादरम्यान गुलनाज अनेक व्हिडीओ आणि रील्समध्ये दिसत होती, पण नंतर अचानक पलाशने तिला अनफॉलो केल्यामुळे संशय अधिकच वाढला. ही पोस्ट व्हायरल होताच नेटिझन्सने गुलनाज खानच्या नावावरून कमेंट्सचा पाऊस पाडला आणि तिच्या सोशल प्रोफाइलवर ट्रॅफिक वाढलं.
गुलनाज खान ही मुंबईतील व्यावसायिक कोरिओग्राफर आहे.(involving) ती गेल्या 11 वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. 2006 साली ती बॉस्को-सीझर टीममध्ये सामील झाली आणि तेव्हापासून सतत त्यांच्यासोबत काम करत आहे. ती एक व्हर्सेटाईल डान्सर असून असिस्टंट कोरिओग्राफर, अभिनेत्री आणि इव्हेंट प्लानर म्हणूनही काम करते.गुलनाजने ‘बँग बँग’, ‘वॉर’, ‘वॉर 2’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ यांसारख्या मोठ्या प्रोजेक्टवर काम केले आहे. अलीकडेच तिने ‘वॉर 2’ मधील ‘आवान जवान’ गाण्यावर हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांच्यासोबत कोरिओग्राफी केली. तसेच राम चरण, शाहिद कपूर, जॅकलिन फर्नांडिस, कतरिना कैफ अशा अनेक स्टार्ससोबतही तिने काम केले आहे.

मेरी डि’कोस्टाचा खुलासा: “मी ती महिला नाही” दरम्यान, पलाश मुच्छलवर फसवणुकीचे आरोप होत असताना मेरी डि’कोस्टाने पोस्ट केलेले चॅट स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते. (involving) त्यामध्ये पलाश तिच्यासोबत फ्लर्ट करत असल्याचे दिसत असल्याचा दावा करण्यात आला. मात्र 26 नोव्हेंबरला मेरीने एक लांबलचक पोस्ट करून तिच्यावर लावले जाणारे आरोप खोटे असल्याचे सांगितले. “पलाशसोबत ज्याचं नाव जोडलं जात आहे ती मी नाही, कृपया चुकीच्या अफवा पसरवू नका,” असे आवाहनही तिने केले. या सर्व घडामोडींमुळे पलाश-स्मृती प्रकरणावरचे वादळ अजून शांत झालेले नाही. सोशल मीडियावरून सतत नवी माहिती, दावे आणि आरोप समोर येत असून दोघांचे लग्न पुढे कधी होणार याबाबतही चाहत्यांच्या मनात प्रश्नच प्रश्न आहेत.
हेही वाचा :
शिंदे सेनेकडून एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी…
एका तासाचे किती घेशील?, नॅशनल क्रश अभिनेत्रीला अश्लील मेसेज
महिलेकडून पुरुषावर लैंगिक अत्याचार, गुंगीचं औषध दिलं अन् नंतर….