डिसेंबर महिन्याची सुरुवात होताच देशभरात लागू होणाऱ्या नियमांसह(prices)एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही बदल करण्यात आले आहेत. महिन्याच्या पहिल्या दिवशी होणाऱ्या दरआढाव्यानुसार तेल कंपन्यांनी 19 किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे. या निर्णयाचा फायदा लाखो व्यावसायिक ग्राहकांना होणार असला तरी घरगुती 14.2 किलो सिलिंडरचे दर मात्र पूर्ववतच ठेवण्यात आल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळालेला नाही.

१ डिसेंबरपासून लागू झालेल्या नवीन दरांनुसार दिल्ली, (prices)मुंबई, कोलकाता आणि चेन्नई यांसह अनेक शहरांत व्यावसायिक सिलिंडरचे नवे दर त्वरित लागू झाले आहेत. व्यावसायिक सिलिंडर 10 रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल नसल्याने घरगुती वापरकर्त्यांना पूर्वीप्रमाणेच जुना दर मोजावा लागणार आहे.
तेल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरमध्ये 10 रुपयांची कपात केली आहे. दिल्लीमध्ये हा सिलिंडर आता 1590.50 ऐवजी 1580.50 रुपयांचा झाला आहे.(prices) कोलकात्यातील किंमत 1694 वरून 1684 रुपये, तर मुंबईत 1542 वरून 1531.50 रुपये इतकी करण्यात आली आहे. चेन्नईतही दर कमी होऊन 1750 वरून 1739.50 रुपये असा नवा दर जाहीर करण्यात आला आहे.या कपातीमुळे रेस्टॉरंट, हॉटेल्स, कॅटरिंग, फूड स्टॉल्स आणि व्यावसायिक स्वयंपाक करणाऱ्या व्यवसायांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत वाढ होत असल्याने या कपातीला बाजारातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
याउलट, घरगुती 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही. इंडियन ऑईलच्या माहितीनुसार दिल्लीत घरगुती सिलिंडरची किंमत अजूनही 853 रुपये आहे. मुंबईत 852.50 रुपये, लखनऊमध्ये 890.50 रुपये, कारगिलमध्ये 985.50 रुपये आणि पुलवामा येथे 969 रुपये हा दर कायम ठेवण्यात आला आहे.घरगुती सिलिंडरचे दर वाढत्या महागाईच्या काळात सामान्य ग्राहकांसाठी मोठा भार ठरत असून दरकपातीची अपेक्षा बाळगणाऱ्या ग्राहकांना आज दिलासा न मिळाल्याचे स्पष्ट दिसून येते. सबसिडी योजना असली तरी ती केवळ पात्र लाभार्थ्यांनाच मिळाल्याने बहुसंख्य ग्राहकांना प्रत्यक्ष फायदा मिळत नाही.

एलपीजीच्या किमती आयात समानता किंमत, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर, डॉलर-रुपया विनिमय दर, स्थानिक कर, वाहतूक खर्च आणि प्रक्रिया शुल्क यांच्या एकत्रित गणनेनुसार ठरवले जातात.(prices) त्यामुळे दर महिन्याला किमतींमध्ये बदल होण्याची शक्यता असते.डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक सिलिंडरच्या दरकपातीने काही प्रमाणात बाजारातील खर्च कमी होणार असला तरी घरगुती वापरकर्त्यांना दरकपातीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हेही वाचा :
स्मृती मंधाना–पलाश मुच्छलच्या लग्नाची नवीन तारीख काय?
राज्यातील ‘या’ जिल्हा परिषद व महापालिकांचे नव्याने आरक्षण सोडत होणार!
क्रिकेटप्रेमींनो! भारत–पाकिस्तान महामुकाबला ‘या’ दिवशी रंगणार