टॅटू काढण्याची फॅशन आजकाल जोरात सुरू आहे,(cancer)अनेक जण आपल्या हातावर किंवा शरीराच्या इतर भागांवर वेगवेगळ्या डिझाइनचे सुंदर असे टॅटू काढतात. टॅटूमुळे शरीर आकर्षक दिसतं, सर्वसामान्यपणे शरीरावर टॅटू काढल्यामुळे कोणतंही नुकसान होत नाही. मात्र असं देखील म्हटलं जातं की अशा प्रकारचे टॅटू काढल्यामुळे काही प्रमाणात एचआयव्हीचा धोका देखील असतो. मात्र आता एका संशोधनातून हादरवणारी माहिती समोर आली आहे. स्वीडन विद्यापीठाच्या संशोधनातून असं समोर आलं आहे की, शरीरावर टॅटू काढल्यामुळे कॅन्सरचा देखील धोका वाढतो.

संशोधनातून असं समोर आलं आहे की, जे आपल्या शरीरावर टॅटू काढतात (cancer)त्यांना मेलानोमा एक प्रकारचा स्किन कॅन्सर चा धोका इतर लोकांच्या तुलनेत अधिक असतो. या संशोधनामध्ये 20 ते 60 वयोगटातील सुमारे 2,880 लोकांना सहभागी करून घेण्यात आलं होतं, ज्यांना मेलानोमा नावाचा कॅन्सर झाला होता. या रिसर्चमधून असं समोर आलं आहे की, शरीरावर टॅटू काढताना ज्यांचं वय हे दहा वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा लोकांना या कॅन्सरचा धोका तुलनेनं जास्त आहे.
रिसर्चमध्ये असं समोर आलं की, टॅटू बनवण्यासाठी जी इंक वापरली जाते, (cancer)ती इंक जेव्हा आपल्या त्वचेमध्ये इंजेक्ट केली जाते, तेव्हा आपलं शरीर या इंकलाशरिराबाहेरील हानिकारक तत्व मानतं, आपल्या शरीरावर कोणी तरी हल्ला केला आहे, असं वाटल्यामुळे शरीराची इम्यून सिस्टम सक्रिय होते. त्यामुळे होत काय की ही इंक रोगप्रतिकारक पेशींनी वेढली जाते. मात्र ही इंक पेशींपर्यंत पोहोचते. टॅटू बनवण्यासाठी जी इंक वापरी जाते, त्यामध्ये अशी काही द्रव्य असतात जी पुढे चालून कॅन्सरसारख्या रोगाला कारणीभूत ठरतात. जर तुमच्या शरीराचा टॅटू काढलेला भाग जास्त काळ सतत सूर्याच्या संपर्कात राहिला तर तुम्हाला कॅन्सरचा धोका इतरांच्या तुलनेनं अधिक वाढतो, असं हे रिसर्च सांगतं.

मात्र जरी धोका वाढत असला तरी देखील या रिसर्चमधून ठोस (cancer)असा निष्कर्ष काढण्यात आलेला नाहीये की, टॅटूमुळे कॅन्सर होतोच म्हणून, फक्त त्यामध्ये असं म्हटलं आहे की, टॅटू काढणाऱ्यांमध्ये टॅटू न काढण्याऱ्यांपेक्षा कॅन्सरचा धोका अधिक असतो. टॅटू आणि कॅन्सरचा थेट संबंध या संशोधनात कुठेही आढळून आलेला नाहीये. त्यामुळे आपला टॅटू असलेला शरिराचा भाग हा थेट सूर्य प्रकाशात वारंवार आणि जास्त काळ येणार नाही, याची काळजी घ्यावी, असं हे संशोधन सांगतं.
हेही वाचा :
स्मृती मंधाना–पलाश मुच्छलच्या लग्नाची नवीन तारीख काय?
राज्यातील ‘या’ जिल्हा परिषद व महापालिकांचे नव्याने आरक्षण सोडत होणार!
क्रिकेटप्रेमींनो! भारत–पाकिस्तान महामुकाबला ‘या’ दिवशी रंगणार