रेल्वे प्रवाशांना आता तात्काळ तिकिट बुकिंगसाठी ओटीपी-आधारित प्रमाणीकरण (required)प्रणालीचा लाभ घेता येणार आहे. भारतीय रेल्वे ६ डिसेंबर २०२५ पासून मध्य रेल्वेमध्ये तत्काळ तिकिट बुकिंगसाठी नवीन ओटीपी-आधारित प्रमाणीकरण प्रणाली लागू करणार आहे. ही नवी प्रणाली काही मोजक्याच लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी लागू केली जाणार आहे.ही नवीन प्रणाली संगणकीकृत पीआरएस काउंटर, अधिकृत एजंट आणि आयआरसीटीसी वेबसाइट/अॅपद्वारे बुक केलेल्या तत्काळ तिकिटांसाठी लागू असेल.

या प्रक्रियेअंतर्गत, प्रवाशांना बुकिंगच्या वेळी दिलेल्या(required) मोबाइल नंबरवर वन टाईम ओटीपी मिळणार आहे. यशस्वी ओटीपी पडताळणीनंतरच तत्काळ तिकिट जारी केले जाईल. या उपाययोजनेचा उद्देश पारदर्शकता आणखी वाढवणे, गैरवापर रोखणे आणि तात्काळ कोट्यातील बुकिंगचा लाभ योग्य प्रवाशांना मिळावा याची खात्री करणे हा आहे.
६ डिसेंबर पासून ‘या’ गाड्यांसाठी सुविधा लागू केली जाईल
12219 लोकमान्य टिळक टर्मिनस – सिकंदराबाद दुरांतो एक्सप्रेस
12221 पुणे – हावडा दुरांतो (required)एक्सप्रेस
12223 लोकमान्य टिळक टर्मिनस– एर्नाकुलम जंक्शन दुरांतो एक्सप्रेस
12261 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस– हावडा दुरांतो एक्सप्रेस
12263 पुणे – हजरत निजामुद्दीन जंक्शन दुरांतो एक्सप्रेस
12289 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर दुरांतो एक्सप्रेस
12290 नागपूर – छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस दुरांतो एक्सप्रेस
12293 लोकमान्य टिळक टर्मिनस – प्रयागराज दुरांतो एक्सप्रेस
12298 पुणे – अहमदाबाद जंक्शन दुरांतो एक्सप्रेस
20101 नागपूर – सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस
20670 पुणे – हुबळी जंक्शन वंदे भारत एक्सप्रेस
20673 छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर – पुणे वंदे भारत एक्सप्रेस
20674 पुणे – छत्रपती शाहू महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस
12025 पुणे – हैदराबाद शताब्दी एक्सप्रेस
22221 छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – हजरत निजामुद्दीन जंक्शन राजधानी एक्सप्रेस दि. 05.12.2025 पासून
हेही वाचा :
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! राज्यातील शाळा 5 डिसेंबरला बंद
EVM मशीनची पूजा करणं पडलं महागात; महिला उमेदवारांवर गुन्हा
उरलेत केवळ तीन दिवस; तुमचा ईएमआय कमी होणार? खिशावरील