हृदयविकाराचे झटके नेहमीच तीव्र छातीत दुखणे निर्माण करतात असे नाही.(attack) काही वेळा कोणतीही ठोस चिन्हे न दिसता “सायलेंट हार्ट अटॅक” येतो आणि रुग्णाला त्याची जाणीवही होत नाही. अशा प्रकारातील सौम्य, विसंगत किंवा वेगळ्या स्वरूपातील संकेतांकडे दुर्लक्ष केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे मूक हृदयविकाराची चिन्हे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.छातीत निर्माण होणारी सौम्य कळ, दाब किंवा कंप याला अनेकजण अपचन, गॅस किंवा साध्या अस्वस्थतेशी जोडतात; परंतु अशाच सौम्य त्रासातून सायलेंट हार्ट अटॅक सुरू होऊ शकतो. काही वेळा ही संवेदना काही मिनिटे टिकून नंतर आपोआप कमी होते, ज्यामुळे लोक त्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. विशेषतः वयोगट वाढल्यावर असे संकेत अधिक अस्पष्ट होतात आणि धोका वाढतो.

थकवा देखील असा एक महत्त्वाचा इशारा असतो.(attack) अचानक अंगात अशक्तपणा येणे किंवा विश्रांतीच्या ऊर्जा न येणे, ही लक्षणे अनेकदा महिलांमध्ये अधिक दिसतात. यासोबत सौम्य श्वास लागणे, धाप लागल्यासारखे वाटणे किंवा कारण नसताना श्वास घेण्यास त्रास होणे हेही सायलेंट हार्ट अटॅकचे संकेत मानले जातात. काही रुग्णांमध्ये छातीऐवजी जबडा, मान, पाठ, हात किंवा पोटाच्या भागात हलका त्रास जाणवतो आणि त्यामुळेही खऱ्या कारणाची कल्पना येत नाही.
अचानक थंड घाम येणे, अस्पष्ट मळमळ, चक्कर येणे किंवा (attack) झोपेतून घाबरून जागे हेही त्याचे सौम्य पण महत्त्वाचे संकेत असतात. वातावरणातील बदल, ताण किंवा थकवा यांना कारणीभूत धरून लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे योग्य वेळी उपचार न मिळाल्यास हृदयाच्या स्नायूंवर कायमचा परिणाम होण्याची शक्यता वाढते. रात्री झोपेचा त्रास, अस्वस्थता किंवा वारंवार जागे होणेही असा धोका दर्शवते.

या प्रकारचा हृदयविकार मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढलेले असणे, (attack) लठ्ठपणा किंवा धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये अधिक दिसतो. विशेषतः मधुमेहींमध्ये मज्जातंतू कमी संवेदनशील झाल्यामुळे त्यांना वेदना जाणवत नाहीत आणि त्यामुळे सायलेंट हार्ट अटॅकचा धोका अधिक वाढतो. सर्वात मोठे संकट म्हणजे रुग्णाला झटका येत आहे हेच लक्षात येत नाही. परिणामी उपचार उशिरा मिळाल्यास गंभीर हृदय समस्या, हृदयाची कार्यक्षमता घटणे किंवा भविष्यात तीव्र हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त वाढतो.
हेही वाचा :
विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! राज्यातील शाळा 5 डिसेंबरला बंद
EVM मशीनची पूजा करणं पडलं महागात; महिला उमेदवारांवर गुन्हा
उरलेत केवळ तीन दिवस; तुमचा ईएमआय कमी होणार? खिशावरील