भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न रद्द झाल्याची अधिकृतर माहिती आता समोर आसी आहे. स्मृती आणि पलाश यांनी स्वतः आपापल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत लग्न रद्द झाल्याची माहिती दिली. त्यानंतर महिला क्रिकेट संघातील क्रिकेटपटूंनी मोठा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून स्मृती आणि पलाशच्या लग्नाबाबत अफवा पसरवल्या जात होत्या. त्यामुळे स्वतः पुढे येऊन याबाबत बोलणे अतिशय गरजेचे होते. त्यामुळे दोघांनीही पोस्ट शेअर करत गोपनियतेचा आदर करा असे म्हटले आहे. तसेच त्यांनी सर्वांना त्यांच्या गोपनीयतेचा आदर करावा, अशी विनंतीही केली.

लग्न रद्द झाल्याची अधिकृत घोषणा आता आली असली तरी अफवा सुरू झाल्यापासूनच भारतीय महिला क्रिकेटपटूंनी पलाश मुच्छलबाबत मोठा निर्णय घेतला. त्यांनी सोशल मीडियावर पलाशला अनफॉलो करायला सुरुवात केली होती.

भारतीय महिला संघातील 10 खेळाडूंनी पलाशला अनफॉलोला केले असून या सर्व खेळाडू स्मृती मानधनाच्या अत्यंत जवळच्या मानल्या जातात. या खेळाडूंमध्ये स्मृती मंधाना (स्वतः), जेमिमाह रॉड्रिग्स, राधा यादव, श्रेयंका पाटील, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकुर, शिफाली वर्मा (शिवाली शिंदे), यास्तिका भाटिया, ऋचा घोष, दीप्ती शर्मा यांचा समावेश आहे.

“टीम स्मृती”ने एकजूट दाखवत पलाश मुच्छलला सोशल मीडियावरून अनफॉलो करून आपली नाराजी स्पष्ट केली आहे. याबाबत पलाशने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता स्मृती तिच्या आयुष्यात सर्व विसरुन पुढे चाचली आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *