भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि(decision)संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाविषयी विविध चर्चा सुरू होत्या. कारण 23 नोव्हेंबरला होणारे लग्न पुढे ढकलण्यात आल्यानंतर, 7 डिसेंबरला लग्न होईल अशी चर्चा चांगलीच रंगली होती. मात्र स्मृतीने 7 डिसेंबरच्या दुपारीच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लग्न रद्द झाल्याची अधिकृत घोषणा करून सर्व चर्चांवर शिक्कामोर्तब केले.स्मृतीने तिच्या खासगी आयुष्याविषयी बोलताना, गेल्या काही दिवसांत सुरू असलेल्या अंदाजांना पूर्णविराम देण्यासाठी हे बोलणं आवश्यक असल्याचं सांगितलं. तिने आपल्या स्टोरीत स्पष्टपणे नमूद केलं की, “लग्न रद्द करण्यात आलं आहे”, आणि दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंतीही केली.

तिच्या या घोषणेनंतर काही वेळातच पलाश मुच्छलनेही आपल्या सोशल मीडियावरून(decision) लग्न रद्द झाल्याचं जाहीर केलं.स्मृतीच्या घोषणेनंतर 24 तासांच्या आतच पलाशने सोशल मीडियावरून काही महत्त्वाचे निर्णय घेतल्यामुळे चर्चांना आणखी उधाण आलं आहे. क्रिकेट स्टेडियममध्ये स्मृतीला रोमँटिक पद्धतीने केलेल्या प्रपोजलचा व्हिडिओ पलाशने पूर्णपणे डिलीट केला आहे. हा तोच व्हिडिओ होता ज्यात ज्या मैदानावर भारतीय महिला संघाने वर्ल्ड कप जिंकला, त्याच मैदानावर पलाशने स्मृतीला प्रपोज केले होते. हा व्हिडिओ आधी हटवला गेला नव्हता, त्यामुळे अनेकांनी त्याला ट्रोल करत “आता तरी काढ” अशा कमेंट्स केल्या होत्या.
त्यानंतर पलाशने हा व्हिडिओ हटवण्यासोबतच वर्ल्डकप सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ(decision) आणि काही इतर पोस्ट्ससुद्धा काढून टाकल्या. यामध्ये स्मृतीच्या नावाचा त्याने केलेला टॅटू असलेला फोटोदेखील डिलीट करण्यात आला आहे. मात्र त्याचा वाढदिवसाचा एक व्हिडिओ अजूनही त्याच्या प्रोफाइलवर दिसतो, ज्यात स्मृतीही उपस्थित आहे. दुसरीकडे स्मृतीने तिच्या इन्स्टाग्राम फीडमधून पलाशसोबतचे सर्व फोटो-पोस्ट्स काढून टाकले असून, त्याची बहीण पलक मुच्छल हिलाही तिने अनफॉलो केले आहे.स्मृतीने लग्न रद्द केल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. 23 नोव्हेंबरला सांगलीत होणारं लग्न तिच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे पुढे ढकलण्यात आलं होतं. त्यानंतर पलाशवर काही गंभीर आरोप झाले.

त्याच्या नावावर काही मुलींसोबतचे चॅट्स लीक झाल्याचा दावा करण्यात आला होता. (decision)त्यामुळे स्मृतीची फसवणूक झाल्याचा आरोप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत होता. मात्र या सर्वांवर दोघांनीही सार्वजनिकरीत्या काही भाष्य केलं नव्हतं. स्मृतीने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट सांगितलं की ती तिचं आयुष्य खासगी ठेवू इच्छिते आणि हे प्रकरण इथेच संपवू इच्छिते. तिच्या या निर्णयानंतर लगेचच पलाशनेही नात्यातून माघार घेतल्याचं जाहीर करून अधिकृतपणे पूर्णविराम दिला. दोघांनी एकमेकांना इंस्टाग्रामवरून अनफॉलोही केलं असून, त्यामुळे नातं पूर्णपणे तुटल्याचं स्पष्ट झालं आहे.
हेही वाचा :
झिरो बॅलेन्स बँक खाते असलेल्यांना मिळणार या मोफत सुविधा
‘…तर 2029 साली महायुतीची सत्ता जाणार’, गंभीर इशारा