उत्तर प्रदेशमधील पूर्वांचल एक्सप्रेसवेवरील टोल नाक्यावर कपलचा(expressway) रोमान्स करतानाचा कारमधील व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. कारमध्ये कपल किस करतानाचा व्हिडिओ उत्तर प्रदेशमध्ये व्हायरल झाला. टोल प्लाझावरील एटीएमएसच्या व्यवस्थापकावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून खासगी क्षणांचे व्हिडिओ फुटेज काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्या व्हिडिओच्या माध्यामातून ब्लॅकमेल केल्याचा आरोपही कपलकडून करण्यात आला आहे.

सीसीटीव्हीचा गैरवापर करून अश्लील व्हिडिओ केल्याबद्दल(expressway) कपलकडून मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार दाखल कऱण्यात आली आहे. त्याशिवाय पोलिस स्टेशनमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात टोल मॅनेजरचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप तक्रारदाराने केला आहे. टोल नाक्यावरील सीसीटीव्हीद्वारे लोकांच्या खासगी क्षणाचे अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केले जातेय. या तक्रारीनंतर उत्तर प्रदेशमध्ये यासारख्या अनेक प्रकाराची चर्चा सुरू झाली आहे.
लग्नानंतर काही दिवसांनी जोडपे लखनौला निघाले होते.(expressway) त्यावेळी हलियापूर टोल प्लाझाच्या आधी कार थांबवण्यात आली. नवऱ्याने कारमध्येच बायकोला कीस केले. त्याचवेळी टोल प्लाझावर बसवलेल्या सीसीटीव्हीत झूम करून हा क्षण रेकॉर्ड करण्यात आला. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करण्यात आले. पैसे घेतल्यानंतरही आरोपींनी व्हिडिओ व्हायरल केला असा आरोप कऱण्यात येत आहे. टोल प्लाझाच्या व्यवस्थापकाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

सुलतानपूरमधील हलियापूर टोल प्लाझावरील (expressway)आशुतोष विश्वास यांच्यावर याआधीही महिला अन् मुलींचे व्हिडिओ तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एक्सप्रेसवेजवळील गावांमधील महिला आणि मुलींचे अश्लील व्हिडिओ त्याने काढल्याचा आरोप होतेय. मुलींचे आणि महिलांचे शौच करतानाचे व्हिडिओ बनवले आणि व्हायरल केल्याचा आरोप कऱण्यात आला. काही लोकांनी या प्रकरणाची तक्रार थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे करत कठोर कारवाईची मागणी केली.
हेही वाचा :
झिरो बॅलेन्स बँक खाते असलेल्यांना मिळणार या मोफत सुविधा
‘…तर 2029 साली महायुतीची सत्ता जाणार’, गंभीर इशारा