सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे ब्लड प्रेशरवर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे.(juices)या समस्येमध्ये बऱ्याचदा आधी लक्षणे दिसत नाहीत. मात्र यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा किडनीच्या आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे बीपी नियंत्रित ठेवण्यासाठी पौष्टीक आहार, रोजच्या रोज व्यायाम आणि संतुलित जीवनशैली यांसोबत काही नैसर्गिक पेयांचा समावेश करणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. ही पेये औषधांच्या ऐवजी वापरायची नसून, त्यांच्या जोडीने घेतल्यास रक्तदाब व्यवस्थापन जास्त प्रभावीपणे करता येते.

जास्वंदाचा चहा
जास्वंदाचा चहा हे सकाळी घेण्यास उत्तम पेय मानले जाते. (juices)जास्वंदातला बायोअॅक्टिव्ह कंपाऊंड नैसर्गिक ACE इनहिबिटरप्रमाणे कार्य करतो आणि रक्तदाब हळूहळू कमी करण्यात मदत करतात. काही अभ्यासांनुसार दिवसातून साधारण तीन कप जास्वंदाचा चहा घेतल्यास सिस्टोलिक रक्तदाबात ७ पॉइंटपर्यंत घट दिसते.
बीटाचा रस
बीटाचा रस हा रक्तदाब नियंत्रणासाठी वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला आणखी एक प्रभावी पर्याय आहे. बीटामधील नायट्रेट्स शरीरात जाऊन नायट्रिक ऑक्साइडमध्ये रूपांतरित होतात, जे रक्तवाहिन्या रुंद करून त्यातील दाब कमी करतात. संशोधनानुसार बीटाचा रस घेतल्यानंतर फक्त ३० मिनिटांत रक्तदाबात घट दिसून येते आणि हा परिणाम पुढील २४ तास टिकू शकतो.
टोमॅटो ज्यूस
अनसॉल्टेड टोमॅटो ज्यूस सुद्धा रक्तदाबासाठी उपयुक्त मानला जातो.(juices) यात असलेले पोटॅशियम आणि लाइकोपीन हे घटक हृदयाचे आरोग्य सुधारतात आणि रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करतात. पोटॅशियम शरीरातील सोडियमचे प्रमाण नियंत्रित करते, तर लाइकोपीन अँटिऑक्सिडंट म्हणून दाह कमी करून कोलेस्टेरॉलवरही चांगला परिणाम करतो.

डाळिंबाचा रस
डाळिंबाचा रस, ग्रीन टी यांसारखी इतर पेयेही रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.(juices) डाळिंब रसातील अँटिऑक्सिडंट्स सिस्टोलिक आणि डायस्टोलिक दोन्ही रक्तदाबावर सकारात्मक परिणाम करतात. ग्रीन टीमधील संयुगे रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढवतात आणि शरीरातील दाह कमी करतात.
हेही वाचा :
झिरो बॅलेन्स बँक खाते असलेल्यांना मिळणार या मोफत सुविधा
‘…तर 2029 साली महायुतीची सत्ता जाणार’, गंभीर इशाराEdit