मालेगाव येथे तीन वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार आणि त्यानंतर झालेली(children)निर्घृण हत्या यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. मालेगावपाठोपाठ आता मनमाड शहरातही एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. एका 64 वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी 64 वर्षांच्या व्यक्तीला अटक करुन गुन्हा दाखल केला आहे.मालेगाव पाठोपाठ आता मनमाड शहरात ही अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी मनमाड पोलिस ठाण्यात 938/25 ॲट्रॉसिटी व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबा भागवत असं या नराधम आरोपीचे नाव आहे.(children)मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी बाबा भागवत वय वर्ष 64 याचे लॉन्ड्रीचे दुकान आहे. या दुकानात इस्त्रीचे कपडे घेऊन येणाऱ्या लहान मूलांसोबत संशयित आरोपी अश्लील चाळे करायचा. त्यांना जवळ घ्यायचा आणि अनैसर्गिक पद्धतीने त्यांच्यासोबत वर्तन करायचा. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीत याच्या कुटुंबातील लहान सात वर्षांच्या बालकासोबत अनैसर्गिक अत्याचाराची घटना घडल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण करत तेथील सर्व पुरावे हे गोळा केले आहेत.(children) संशयित आरोपीला मनमाड पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन देखील पोलिसांनी दिले आहे.नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, मनमाड नंतर आता सटाण्यात 9 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर एका 75 वर्षीय नामदेव गुंजाळ या संशयित आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडल्याने तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे.

माणूसकीला काळीमा फासणारी ही घटना समजताच (children)नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सटाणा पोलिस ठाण्यात गर्दी केली असून सदर अल्पवयीन बालिकेला गेल्या सहा महिन्यापासून अत्याचाराला सामोरे जावे लागत होते.या चिमुकलीला पैशे, चॉकलेट असे आमिष दाखवत एका जागेवर नेत या संशयित आरोपीने वारंवार तिच्यावर अत्याचार केले असे फिर्यादीत आरोप करण्यात आले असून पोलिसांनी या आरोपीला तत्काळ अटक केली आहे. त्याच्या विरोधात सटाणा पोलिस स्टेशन मध्ये पोस्कोसह इतर कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा :

“इचलकरंजीत जागावाटपानंतर भाजपमध्ये कट-थ्रोट लढत; अनेक

जंक फूडमुळे किती फॅट पोटात जातं? तुमच्या शरीराला किती फॅटीची

मद्यप्रेमी चाखणार 155 वर्षे जुन्या रशियन कंपनीची वाईन, आता

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *