मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यात पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी भयानक (shocking)घटना समोर आली आहे. एका पतीने पॉर्न स्टार बनण्याच्या आकांक्षेने स्वतःच्या पत्नीचा खाजगी व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड करून व्हायरल केला. पत्नीने या घृणास्पद घटनेनंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून सध्या आरोपी फरार आहे; पोलिसांना त्याचा लोकेशन मुंबईत मिळालेला आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, आरोपीला बऱ्याच काळापासून पोर्नोग्राफिक (shocking)साईट्सचे व्यसन होतं आणि या साईट्सवरील व्यक्तींना तो आदर्श मानत होता. या वेडाने प्रेरित होऊन त्याने पत्नीसोबतचा 13 मिनिटे 14 सेकंदांचा खाजगी व्हिडीओ रेकॉर्ड करून तो जाणूनबुजून सोशल मीडियावर पोस्ट केला.व्हिडीओ पत्नीच्या लक्षात आल्यानंतर तिने विरोध केला, पण आरोपीने म्हटले की, ‘मी व्हिडीओ जाणूनबुजून अपलोड केला आहे, मला कोणताही पश्चात्ताप नाही. मला लोकांनी ओळखावे, मला लोकप्रिय व्हायचं आहे.’

पीडितेच्या भावाच्या म्हणण्यानुसार, या कृत्यामागे हुंड्याची मागणी देखील एक कारण आहे.(shocking) दोघांचं लग्न 10 मे रोजी झालं होतं आणि लग्नानंतर आरोपीने सुरुवातीपासूनच हुंड्यासाठी दबाव आणला होता. त्याने 3 लाख रुपयांची मागणी केली होती, त्यापैकी 2 लाख रुपये दिल्यानंतरही संतापलेल्या पतीने हा घृणास्पद कृत्य केले.व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडिता मानसिकदृष्ट्या खचली असून तिने सांगितले की, ‘त्याने हा व्हिडीओ नातेवाईक आणि मित्रांना पाठवला, त्यामुळे माझा समाजात अपमान झाला. त्याने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे, तो माणूस नाही, हैवान आहे.’सध्या पोलीस तपास करत असून आरोपीला लवकरच अटक करण्यासाठी मुंबईला पथक पाठवण्यात येणार आहे.
हेही वाचा :
विधानभवनात गदारोळ! आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज! DA ‘इतक्या’ टक्क्यांनी
३१ डिसेंबरपर्यंत ‘ही’ ५ कामं न केल्यास भरावा लागेल मोठा दंड!Edit