सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे.(plates) जर एचएसआरपी नंबप्लेट बसवली नाही तर तुम्हाला दंड बसू शकतो. २०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना ही नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. त्यानंतरच्या वाहनांना आधीच हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसवली आहे. दरम्यान, राज्यातील अनेक वाहनधारकांनी अजूनही नंबर प्लेट बसवलेली नाहीये. त्यामुळे नंबरप्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

आतापर्यंत राज्यात फक्त ७३ लाख वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवली आहे.(plates)२०१९ पूर्वीच्या एकूण २.१० कोटी वाहनांवर ही नंबरप्लेट लावणे आवश्यक आहे. दरम्यान, आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, अजूनही ६५ टक्के वाहनांवर एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे बाकी आहे. त्यामुळे ही आकडेवारी खूप मोठी आहे. यामुळेच ही मुदतवाढ देण्यात आली आहे.हाय सिक्युरिटी नंबर प्लेटमध्ये सिक्युरिटी फीचर्स आणि होलोग्राम असतो. यामुळे या नंबरप्लेटची नक्कल करणे शक्य नाही. अपघात किंवा गुन्हा झाल्यावर तो ओळखण्यासाठी वाहनाची नंबरप्लेट लागते. यामुळे ही नंबरप्लेट गरजेची आहे. यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात येईल.

एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी ३१ डिसेंबर २०२ ही शेवटची तारीख आहे.(plates) दरम्यान, जर ही नंबरप्लेट लावली नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल. १०,००० रुपयांचा दंड भरावा लागेल. जर तुम्ही ही नंबरप्लेट बसवली नाही तर तुमची आरटीओमधील कोणतीही कामे होणार नाहीत.
हेही वाचा :
“इचलकरंजीत जागावाटपानंतर भाजपमध्ये कट-थ्रोट लढत; अनेक
जंक फूडमुळे किती फॅट पोटात जातं? तुमच्या शरीराला किती फॅटीची
मद्यप्रेमी चाखणार 155 वर्षे जुन्या रशियन कंपनीची वाईन, आता