बाबा वेंगा यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. येणारं नवीन वर्ष म्हणजे २०२६ मध्ये जगावर(world) नेमकी काय संकटं येणार ही बाबा वेंगांनी सांगितली. मार्च २०२६ ला जगावर संकट येणार असून डिसेंबर २०२६ पर्यंत वेगवेगळ्या संकटांनी जग हादरून जाणार असल्याचा अंदाज त्यांच्याकडून वर्तवण्यात आला आहे. यामध्ये नैसर्गिक आपत्ती, तिसरे महायुद्ध आणि अंतराळाशी संबंधित महत्वाच्या समस्यांचा समावेश असणार आहे.नेत्रहीन बल्गेरियन महिला वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा उर्फ बाबा वेंगा या त्यांच्या भविष्यवाण्यांसाठी जगभरातमध्ये प्रसिद्ध होत्या. त्यांना बाल्कनचे नोस्ट्राडेमस असे म्हणून देखील ओळखले जायचे.

१९९६ मध्ये त्यांचे निधन झाले होते पण त्यांनी करून ठेवलेल्या (world) भविष्यवाणी ८५ टक्के खऱ्या ठरल्या आहेत. त्या आज या जगात नाहीत तरी देखील त्यांच्या निधनाच्या २८ वर्षांनंतर जगातील नागरिकांना त्यांची भविष्यवाणी ऐकण्याची उत्सुकता असते.बाबा वेंगाच्या भविष्यवाण्यांमध्ये कोरोना महामारी, ९/११ हल्ला आणि राजकुमारी डायना यांचा मृत्यू यासारख्या घटनांचा समावेश आहे. बाबा वेंगा यांनी दुसरे महायुद्ध, चेकोस्लोव्हाकिया आणि युगोस्लाव्हियाचे विभाजन, चेर्नोबिल अणू दुर्घटना, स्टॅलिनच्या मृत्यूची तारीख अशी अनेक भविष्यवाणी केली होती आणि ती खरी देखील ठरली. बाबा वेंगा २०२६ या वर्षासाठी काय भविष्यवाणी करतात? याकडे सर्व जगाचे लक्ष लागले होते. अखेर त्यांच्या भविष्यवाण्या समोर आल्या आहेत. त्यांनी सांगितले की, नवीन वर्षात मार्चपासून संकटांना सुरूवात होईल आणि डिसेंबरपर्यंत विनाश होईल.
बाबा वेंगा यांनी सांगितले की, मार्च २०२६ मध्ये एक मोठे महायुद्ध सुरू होऊ शकते. (world) हे महायुद्ध रशिया आणि चीनसारख्या पूर्वेकडील देशांतून सुरू होऊन अमेरिका आणि युरोप सारख्या पाश्चात्य देशांना नष्ट करेल. याला तिसरे महायुद्ध असेही म्हणता येईल. हा संघर्ष मर्यादित सीमांच्या पलीकडे विस्तारेल आणि जगातील सर्व खंडांवर परिणाम करेल.बाबा वेगा यांनी अशीही भविष्यवाणी केली की, एप्रिल आणि जून महिन्यांमध्ये असंख्य नैसर्गिक आपत्ती येईल. यात भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक आणि तीव्र हवामानामुळे पृथ्वीच्या भूपृष्ठाचा ७-८ टक्के भाग उद्ध्वस्त होऊ शकतो. यामुळे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होऊ शकते आणि आर्थिक मंदी येऊ शकते.

२०२६ हे वर्ष तंत्रज्ञान आणि अवकाश विज्ञानाच्या जगात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकते, (world) असे बाबा वेंगा यांनी सांगितले. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, या वर्षी यंत्रे आणि प्रगत तंत्रज्ञानाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम पूर्वीपेक्षा जास्त असेल. बाबा वेंगांनी अवकाशाशी संबंधित भविष्यवाणी केली असून त्यामध्ये, नोव्हेंबर-डिसेंबर २०२६ मध्ये एक मोठी रहस्यमय अवकाश वस्तू पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
विधानभवनात गदारोळ! आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज! DA ‘इतक्या’ टक्क्यांनी
३१ डिसेंबरपर्यंत ‘ही’ ५ कामं न केल्यास भरावा लागेल मोठा दंड!