महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण'(instantly)योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच ३००० रुपये जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांच्या हफ्त्याचे पैसे एकत्रित देण्यात येणार आहेत. हे पैसे कधी येणार याची लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत.महापालिका निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना पुन्हा चर्चेत आली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित पाठवला जाईल. त्यामुळे त्यांच्या खात्यात एकत्रित ३००० रुपये जमा होतील ही महायुती सरकारची सुनियोजित रणनीती असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी मांडले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी या निर्णयाचा महायुती सरकारला फायदा होऊ शकतो असे देखील मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एकाच वेळी (instantly)दोन महिन्यांच्या हफ्त्याचे पैसे देऊन महायुती सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करू शकेल. सुत्रांनी सांगितले की, नोव्हेंबरचा हफ्ता अद्याप देण्यात आला नाही. सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हफ्ता एकत्रित पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत.(instantly) नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होतील. आचारसंहितेदरम्यान कोणत्याही प्रकारची वादग्रस्त परिस्थिती निर्माण होऊ नये अशी सरकारची इच्छा आहे. म्हणून लाडकी बहीण योजनेचा हफ्ता देण्यात खबरदारी घेतली जात आहे. विधानसभा निवडणुकीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही सरकारला लाडकी बहीण योजनेचा फायदा होऊ शकतो.

तसंच, सरकारने याआधी आणि आता देखील हिवाळी (instantly)अधिवेशनात स्पष्ट केले की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले की, ‘लाडकी बहीण योजना अजिबात बंद होणार नाही. या योजनेचे पैसे लाडकींच्या खात्यात जमा केले जातील. योग्य वेळी आम्ही लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ.’ तर, आतापर्यंत २ कोटी ४३ लाख लाडक्या बहिणींचे रजिस्ट्रेशन झाले असून ई -केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ करण्यात आली असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

हेही वाचा :

विधानभवनात गदारोळ! आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज! DA ‘इतक्या’ टक्क्यांनी

३१ डिसेंबरपर्यंत ‘ही’ ५ कामं न केल्यास भरावा लागेल मोठा दंड!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *