उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय राज्यामध्ये हिमालयावरून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव (weather)अतिशय स्पष्टपणे दिसत असून, या राज्यांमध्ये हिमवृष्टी आणि प्रचंड कडाक्याची थंडी असं वातावरण पाहायला मिळत आहे. काही भागांमध्ये पारा उणेमध्ये गेला आहे. अशी परिस्थिती असतानाच उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींनी आता मध्य भारतासह महाराष्ट्र गाठला आहे. ज्यामुळं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाल्याचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे.

रविवारपासून राज्यभरातील किमान तापमानाचा पारा घसरू लागला असून, (weather)त्यामुळं अनेक शहरांचं तापमान15 अंशांखाली आलं आहे. मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात विशेषतः उत्तर महाराष्ट्रात, नाशिक, संभाजीनगरसह खान्देश, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांत रात्री कडाक्याची थंडी जाणवेल असा अंदाज असून. उत्तर भारतातून थंड हवेचे प्रवाह वाढल्याने राज्यात थंडीचे प्रमाण वाढला आहे असा निष्कर्ष निघत आहे.
राज्यातील गिरीस्थानांमध्ये येणाऱ्या महाबळेश्वर, (weather)माथेरान या ठिकाणांपेक्षा अधिक गारठा विदर्भ आणि धुळ्यात असून, धुळ्यात मागील 24 तासांमधील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली, जिथं हा आकडा 5.4 अंशांवर पोहोचला होता. पुढील 24 तासांमध्ये राज्यात प्रामुख्यानं विदर्भ आणि मराठवाड्यातही थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा जारी करण्यात आला असून, ही थंडीची लाट आता तीव्र होणार असल्याचं म्हणत नागरिकांनाची सतर्क करण्यात आलं आहे. प्रामुख्यानं पुढील 48 तासांमध्ये गारठा वाढणार असल्यानं वृद्ध आणि लहान मुलांसमवेत नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असंही आवाहन यंत्रणा करत आहेत.

कोकणात अंशत: गारठा आणि पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्यावर धुकं (weather)आणि गारठा असं चित्र असेल तर, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्येसुद्धा ही थंडी हजेरी लावताना दिसेल. राज्यात प्रामुख्यानं धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, नाशिक घाट क्षेत्र, सातारा घाट क्षेत्र, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ इथं गारठा तुलनेनं अधिक जाणवणार असल्याचा इशारा आहे.
हेही वाचा :
विधानभवनात गदारोळ! आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज! DA ‘इतक्या’ टक्क्यांनी
३१ डिसेंबरपर्यंत ‘ही’ ५ कामं न केल्यास भरावा लागेल मोठा दंड!Edit